लग्नाचा दिवस हा तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस. या दिवशी तुम्ही सर्वाधिक सुंदर दिसायला हव्या. यासाठी आपल्या त्वचेला केवळ बाहेरूनच नव्हे तर आतूनही काळजीची गरज आहे. तेव्हाच लग्नाच्या दिवशी तुमचे सौंदर्य अजूनच उजळून निघेल. यासाठी लग्नाची तारीख ठरल्यावर नाही तर लग्नाच्या बैठकीपासूनच तयारीला लागा. तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे की तुमच्या रोजच्या आहारात काही चविष्ट आणि गमतीशीर पदार्थांचा समावेश करा. म्हणजे बोरींग डाएट नव्हे तर चटकमटक खा आणि त्वचा उजळवा. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा तुमची त्वचा डाग विरहित, उजळलेली आणि चकाकती असेल तेव्हा तुम्हाला स्वतःलाही फ्रेश वाटेल. यामुळे तुमचा आत्मविश्वास उंचावतो. हाच आत्मविश्वास लग्नाच्या बैठकीपासून ते लग्नापर्यंत टिकायला हवा. सहसा लग्नाची तारीख ठरण्याच्या एक-दोन महिन्यापूर्वी मुली त्वचेची काळजी घेण्यास सुरुवात करतात. यातही केवळ तुमच्या बाह्य चेहऱ्यावर काम केले जाते.
पण लक्षात घ्या ऐन लग्नाच्या हंगामात तुमचे लग्न असेल तर त्वचेला जास्त काळजीची गरज आहे. तुमचे नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवण्यासाठी त्वचेची आतून-बाहेरून देखभाल हवी. तुम्ही पार्लरमध्ये जाणे बंद केले तर तुमची त्वचा निस्तेज व्हायला नको. यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी खास यादी घेऊन आलो. लक्षात ठेवा तुम्हाला दररोज हे पदार्थ खायचे आहेत.
मका( स्वीट कॉर्न), चारोळी सूर्यफूलाचे बी, खरबूजाच्या बिया, सुकामेवा हे सर्व घटक त्वचा सतेज करतात. त्वचेला आवश्यक असणारे स्निग्ध,जीवनसत्व आणि खनिज पुरवतात. यामुळे त्वचेचे कोलेजन वाढवतात. त्वचा डागविरहित, मोकळी आणि तरूण बनवतात.
जर तुम्ही शाकाहारी असाल आहात. लग्नापूर्वी त्वचेला फर्मनेस देऊ इच्छिता तर इथे दिलेल्या सुकामेव्याचे सेवन जरूर करा. जर तुम्ही अंडी खात असाल तर हिवाळ्यात अंड्याचा आहारात समावेश जरूर करा. तुमच्या डाएटमध्ये दिलेल्या प्रमाणात सुकामेव्याचे समावेश हवा.
दररोज ४ अक्रोड खा.
दररोज कमीत कमी २० बदाम खा.
दररोज २ अंडी जरूर खा.
एक ग्लास दुध प्यायला हवे.
एक वाटी दही खा.
दूध आणि दह्याने सुकामेव्याचे पोषण मिळते.शिवाय अँसिडीटी होत नाही.
फळे किंंवा भाज्यांचे सलादः
फळ खाऊन सौंदर्य वाढवणे ही तर अत्यंत जुनी पद्धत आहे. फळ शरीराला आवश्यक असणाऱ्या पोसण तत्वांची कमतरता भरून काढतात. या पोषण तत्वांंची शरीराला खूप गरज असते. काही फळ तर त्वचेला खूप लवकर उजळून टाकण्यात मदत करतात. त्वचेच्या पेशीला गुळगुळीत करतात. या फळांची नाव आम्ही जाणीवपूर्वक सांगत आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा तर छान होईलच. पण तुमच्या खिशावरही अतिरिक्त भार पडणार नाही.
केळ, अननस, अँव्हाकॉडो, सेफ, पपई, डाळिंब, संत्री
काशीफळाच्या बिया आणि भाजी
काशीफळाची भाजी खूप चविष्ट होते. विशेष म्हणजे याच्या बिया संपूर्ण वर्षभर उपलब्ध असतात. ही एक अशी भाजी आहे की तुम्ही वर्षभर खाऊ शकता. विशेषतः हिवाळ्यात ही भाजी आवश्यक आहे.मे आणि जूनमध्ये मात्र भाजी नको. काशीफळाची स्वभाव उष्ण आहे. त्यामुळे या ऋतूत ही भाजी टाळा.