आयरनचे प्रमाण वाढवतात या 4 गोष्टी, रक्त वाढवण्यासाठी होईल मदत

| Updated on: Nov 02, 2023 | 7:14 PM

लोहाची पातळी सुधारली तर रक्त बनण्यास मदत होते. लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत रक्त वाढवण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश केला तर रक्त वाढण्यास मदत होते. जाणून घ्या यासाठी काय खावे.

आयरनचे प्रमाण वाढवतात या 4 गोष्टी, रक्त वाढवण्यासाठी होईल मदत
blood cell
Follow us on

मुंबई : आपल्या आहारात प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे मिळतील असे घटक असणे फार महत्त्वाचे असते. जे हे योग्य प्रमाणात घेतले नाही तर रक्ताची कमतरता होऊ शकते. ज्यामुळे अशक्तपणा जाणवू लागतो. लोहाचे कार्य रक्त तयार करणे आणि हिमोग्लोबिन पातळी नियंत्रित करण्याचे आहे. यासोबतच शरीरात ऊर्जा वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. लोहाच्या कमतरता झाली तर लोकांना थकवा येऊ शकतो.

लोह वाढवण्यासाठी काय खावे?

1. आवळा, बीटरूट आणि गाजर रक्त वाढवतात : बीटरूट आणि गाजरमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते आणि आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे तिन्ही एकत्र खाल्ल्याने लोह वाढण्यास मदत होते. तुम्ही आवळा, बीटरूट आणि गाजरचा रस पिऊ शकता.

2. तिळाचा लाडू : तिळाचा लाडू लोह, तांबे, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन बी 6, फोलेट आणि ई ने भरलेले आहेत. १ चमचे काळे तीळ घ्या आणि नंतर ते कोरडे भाजून घ्या. नंतर त्यात एक चमचा मध आणि तूप मिसळा. मग त्याचा लाडू बनवून खा.

3. खजूर, अंजीर आणि बेदाणे : लोह, मॅग्नेशियम, तांबे, व्हिटॅमिन ए आणि सी या तीन गोष्टी यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही 2-3 खजूर, 2 अंजीर आणि एक चमचा मनुका रोज खावू शकता. हे तिनही रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर खाल्याने यामुळे ऊर्जा वाढते आणि लोहाची पातळी वाढते.

4. रोज एक डाळिंब खा : डाळिंबमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरातील लोह वाढण्यास मदत होते.