हिमोग्लोबिन वाढवणारा आहार!

| Updated on: May 13, 2023 | 4:49 PM

हिमोग्लोबिन हे रक्तपेशींमध्ये असलेले लोह-आधारित प्रथिने आहे. जे शरीरातील सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. यासाठी तुम्हाला काही लोहयुक्त पदार्थांचे सेवन करावे लागेल, तरच हिमोग्लोबिनची कमतरता दूर करणे शक्य होईल.

हिमोग्लोबिन वाढवणारा आहार!
Hemoglobin rich foods
Follow us on

मुंबई: जर आपल्या रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर शरीरात अशक्तपणा येतो आणि दैनंदिन जीवनातील सामान्य कामे करणे अवघड होऊन बसते. हिमोग्लोबिन हे रक्तपेशींमध्ये असलेले लोह-आधारित प्रथिने आहे. जे शरीरातील सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. यासाठी तुम्हाला काही लोहयुक्त पदार्थांचे सेवन करावे लागेल, तरच हिमोग्लोबिनची कमतरता दूर करणे शक्य होईल. चला तर मग जाणून घेऊयात अशा परिस्थितीत कोणते ड्राय फ्रूट्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

हिमोग्लोबिन वाढवणारे ड्रायफ्रुट्स

  1. अक्रोड: हे एक ड्रायफ्रूट आहे ज्यात पोषक तत्वांची कमतरता नसते. मूठभर सोललेले अक्रोड शरीराला सुमारे 0.82 मिलीग्राम लोह प्रदान करते.
  2. पिस्ता: पिस्ताची चव बऱ्याच लोकांना त्याकडे आकर्षित करते. मूठभर पिस्तामध्ये १.११ मिलीग्रॅम लोह असते. नियमित आहारात याचा समावेश केल्यास शरीरात लोह वाढेल, ज्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता दूर होईल.
  3. काजूचा वापर बऱ्याच मिठाई आणि पाककृती सजवण्यासाठी केला जातो, परंतु आपल्याला माहित नसेल की मूठभर काजूमध्ये सुमारे 1.89 मिलीग्राम लोह असते. लोह आणि हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.
  4. बुद्धी वाढविण्यासाठी आपण रोज बदाम खावे असे अनेकदा म्हटले जाते, परंतु हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे जर तुमचे शरीर कमकुवत झाले असेल तर दररोज सकाळी भिजवलेले बदाम आपल्यासाठी जबरदस्त फायदेशीर ठरू शकतात.

(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)