नवी दिल्ली – तसं पहायलं गेलं तर आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे एक महत्व आहे पण डोळे (eyes) हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा (important part of body) आणि तितकाच संवेदनशील अवयव आहे. डोळ्यांमुळेच आपण हे सुंदर जग पाहू शकतो, अनेक नवे अनुभव घेऊ शकतो. पण अनेकदा लोकं डोळ्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्याची विशेष अशी वेगळी काळजी (eye care) घेतली जात नाही.
फोन, लॅपटॉप किंवा टीव्हीसमोर जास्त वेळ बसल्याने आपल्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. यामुळे डोळे दुखणे, डोळे जड होणे, डोकेदुखी, अस्पष्ट दिसू लागणे, डोळे कोरडे होणे असे अनेक त्रास होऊ शकतात. एवढेच नव्हे तर काही वेळेस आपल्याला लक्ष केंद्रित करणे कठीण होते आणि शांत झोप न लागण्याचीही समस्या उद्भवते.
रोजच्या आयुष्यात काहीवेळा लोकं अशा चुका करतात ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होतात व डोळे खराब होऊ शकतात. त्या चुका कोणत्या हे जाणून घेऊया..
डोळे धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणे – बऱ्याच लोकांना डोळे धुण्यासाठी गरम पाणी वापरण्याची सवय असते , मात्र हे योग्य नाही. डोळे नेहमी साध्या किंवा गार पाण्याने धुवावेत.
डोळे न मिचकावणे – डोळे जड होणे किंवा डोळ्याना ताण जाणवणे यापासून बचाव करण्यासाठी डोळे मिचकावणे हा सर्वात उत्तम उपाय ठरतो. यामुळे डोळ्यांना केवळ विश्रांतीच मिळत नाही तर यामुळे डोळे कोरडे पडण्यापासूनही बचाव होतो आणि डोळ्यातील घाणही बाहेर पडते. तज्ज्ञांच्या मते, बऱ्याच वेळेस लोकं मोबाईल किंवा टीव्ही पाहताना डोळे मिचकावत नाहीत. अशा वेळी डोळ्यांची उघडझाप करणे किंवा मिचकावणे गरजेचे ठरते.
कृत्रिम आयड्रॉप्सचा अत्याधिक वापर – डोळ्यात काही त्रास अथवा वेदना होत असतील तर बरेच वेळा लोकं आयड्रॉप्सचा अधिक वापर करतात. बराच काळ आयड्रॉप्स वापरल्याने डोळे कोरडे होऊ शकतात.
झोपताना आय मास्कचा वार करणे – बहुतांश लोक झोपताना आय मास्कचा वापर करतात. हॉट कंप्रेस आयमास्कमुळे तुम्हाला थोडा फायदा मिळू शकतो, पण झोपताना दरवेळेस आयमास्क वापरणे हे डोळ्यांसाठी फायदेशीर नसते. थोडा वेळा डोळे उघडे राहणेही महत्वाचे ठरते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, डोळ्यांना होणाऱ्या कोणत्याही इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी गरमऐवजी थंड पॅकने शेकावे.
डोळे चोळणे – डोळ्यात काही गेले, किंवा खाज यायला लागली तर बऱ्याच वेळेस लोकं डोळे चोळतात. मात्र ते धोकादायक ठरू शकते. डोळ्यांना खाज आली तर ते चोळण्याऐवजी ते गार पाण्याने धुवावेत.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)