मुंबई: हाडे निरोगी ठेवणे खूप गरजेचे आहे. अशा वेळी आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा समावेश करावा. कारण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हाडांच्या विकासास हातभार लावतात. परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या हाडांना हानी पोहोचवण्याचे काम करतात. त्यामुळे या गोष्टी टाळायला हव्यात. आम्ही तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते आज सांगणार आहोत.
सोडियम – सोडियम म्हणजेच जास्त मीठाच्या गोष्टी आपल्या हाडांना नुकसान पोहोचवण्याचे काम करतात. होय, जेव्हा तुम्ही जास्त मीठाचे सेवन करता तेव्हा यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे तुमची हाडे कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे जर तुम्हीही मीठाचे जास्त सेवन करत असाल तर आजच सावध व्हा.
जे लोक जास्त प्रमाणात कार्बोनेटेड ड्रिंक्स पितात त्यांच्या हाडांचे नुकसान होऊ शकते. कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये ॲसिड असते ज्यामुळे रक्तातील ॲसिडिटीची पातळी वाढते. अशा हाडांमधून कॅल्शियम बाहेर पडू लागते. त्यामुळे हाडांची घनता कमी होऊ लागते.
हे खाल्ल्याने हाडांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. जास्त साखर असलेल्या गोष्टी खाल्ल्याने हाडे कमकुवत होऊ शकतात. यामुळे हाडांची घनता कमी होऊ शकते. ज्या लोकांना आधीच ऑस्टिओपोरोसिस आहे. अशा लोकांनी साखरेपासून बनवलेल्या गोष्टी खाऊ नयेत. कारण यामुळे तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात.
जर कॅफिनचे सेवन मर्यादित प्रमाणात केले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण कॅफिन जास्त प्रमाणात घेतले गेले तर त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. परंतु कॅफिनयुक्त पदार्थ हाडांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)