खराब जीवनशैली, आहाराच्या अयोग्य सवयी आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे शरीराचे वजन (weight gain) तर वाढतेच पण पोटावर चरबीही (belly fat) जमा होते. पोटाची चरबी कमी करणे खूप कठीण आहे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी डाएटचे (Weight Loss Diet) पालन करतात मात्र त्याच काही परिणाम होत नाही. वजन कमी होत नाही आणि पोटातील चरबीवरही परिणाम होत नाही. उलट काहीवेळा तब्येत खराब होते, ते वेगळंच असतं. अशा परिस्थितीत पोटाची चरबी कमी करण्यासाठी काय करावे?
सर्वप्रथम प्रत्येक काम करण्यासाठी एका योजनेची गरज असते, हे जाणून घेतले पाहिजे. पोटाची चरबी कमी करण्यासाठीही अशाच योजनेची गरज आहे. फायबर आणि प्रोटीनने परिपूर्ण अशा काही पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो, पण एकाच गोष्टीचे नीट पालन केल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. जर तुम्हाला व्यायाम करून आणि अन्नावर नियंत्रण ठेवून पोट कमी करायचं असेल तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही पदार्थांचे सेवन करणे उपयुक्त ठरेल.
1) ओट्स –
ओट्स हे वजन कमी करणारे सुपरफूड मानले जाते कारण त्यामध्ये प्रोटीन भरपूर असते आणि कॅलरीज कमी असतात. त्यामुळे जर तुम्हाला सपाट पोट हवं असेल तर आहारात ओट्सचा समावेश करा. ओट्स पचण्यास वेळ लागतो, ज्यामुळे आपले शरीर या प्रक्रियेत कॅलरी बर्न करते. इतकंच नव्हे तर ओट्सचे सेवन केल्याने आपले पोट बराच काळ भरलेले राहते. ज्यामुळे इतर जंक फूड किंवा अनहेल्दी पदार्थ खाणे, टाळलं जातं. ओट्स आपल्याला दिवसभर उर्जा देखील प्रदान करतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
2) बीन्स –
बीन्स आणि मसूर सारख्या शेंगांमध्ये प्रथिने आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या आहारात त्यांचा समावेश केल्याने पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते.
3) सॅल्मन –
सॅल्मनसारख्या फॅटी फिशमध्ये प्रथिने, निरोगी चरबी आणि इतर आवश्यक पोषक द्रव्ये भरलेली असतात. हे आपल्याला बऱ्याच काळासाठी तृप्त ठेवते, तसेच अनहेल्दी पदार्थ खाण्यापासून प्रतिबंध करते. अशा प्रकारे आपल्याला आपले वजन कमी करण्याच्या उद्दीष्टापर्यंत पोहोचण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, सॅल्मनमध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड्स भरलेले असतात, ज्यामुळे जळजळ कमी होऊ शकते.
4) सफरचंद –
सफरचंद हे एक असे फळ आहे जे पोटाची चरबी कमी करते. सफरचंदामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते व आपले पोट बराच काळ भरलेले राहते. तसेच सफरचंदामध्ये कॅलरीज आणि साखर अतिशय कमी असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास प्रोत्साहन मिळते. त्यामध्ये असलेले फ्लेवोनॉइड्स हे पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.
5) अळशी –
यामध्ये फायबर, ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स असते, जे पचनासाठी चांगले असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते, तसेच टाइप-2 मधुमेह, हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करते. जलदरित्या वजन कमी करायचे असेल तर अळशीचे सेवन करावे.
6) दही –
वजन कमी करण्याच्या आहारात समावेश करण्यासाठी दही हे एक उत्तम दुग्धजन्य पदार्थ आहे. दह्यमध्ये प्रोबायोटिक बॅक्टेरिया देखील असतात जे आतड्याचे कार्य सुधारतात, तसेच जळजळ आणि लेप्टिन प्रतिरोधापासून संरक्षण करतात, ज्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. वजन कमी करण्यासाठी दह्याचे सेवन उपयुक्त ठरते.