मुंबई: जर आपल्याला आपले शरीर तंदुरुस्त आणि मजबूत ठेवायचे असेल तर प्रत्येक परिस्थितीत हाडे मजबूत असणे आवश्यक आहे, परंतु बरेचदा खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे ही हाडे कमकुवत होऊ लागतात. त्यासाठी आपण कोणत्या गोष्टींचे सेवन करत आहोत आणि कोणत्या व्यसनामुळे आपले शरीर कमकुवत होत आहे, याचा विचार करावा लागेल. चला तर मग जाणून घेऊया हाडे कमकुवत करण्यामागची कारणे कोणती आहेत.
हाडे कमकुवत होण्याची कारणे
- हल्ली कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि कार्बोनेटेड ड्रिंक्सचा खप खूप वाढला आहे, अनेकदा लग्नसमारंभात, पार्ट्यांमध्ये किंवा दैनंदिन जीवनात आपण ते मोठ्या प्रमाणात पितो. अशा पेयांमध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फेट असते जे शरीरातील कॅल्शियम कमी करते.
- मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले तरच तुमचे शरीर निरोगी राहील. सामान्यत: प्रेम किंवा मैत्रीमध्ये फसवणूक, पैशांची कमतरता, ऑफिसमधील समस्या किंवा कोणताही गंभीर आजार यासह अनेक कारणांमुळे आपल्यावर तणाव असू शकतो. हाडे मजबूत ठेवायची असतील तर तणावापासून दूर राहावे लागते कारण तणावामुळे कोर्टिसोल हार्मोन वाढते, ज्यामुळे टॉयलेटच्या माध्यमातून शरीरातून कॅल्शियम बाहेर पडते.
- हाडे मजबूत करण्यासाठी आपल्याला प्रथिनयुक्त आहार घ्यावा लागतो. जे मांस, अंडी, सोयाबीन, डाळ यांसारख्या पदार्थांचे सेवन कमी करतात, त्यांची हाडे कमकुवत होतात.
- भारतात चहा-कॉफी पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, जी अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत चहा-कॉफीचा आस्वाद घ्यायला विसरत नाहीत. या पेयांमध्ये कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे शरीरात कॅल्शियमची गरज वाढते. याचा अर्थ असा की आपल्याला आता अधिक कॅल्शियम युक्त आहार घेण्याची आवश्यकता आहे.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)