मासिक पाळीत भयंकर वेदना होतात? ‘या’ घरगुती उपायांनी झटपट मिळेल आराम

| Updated on: Dec 01, 2024 | 2:12 PM

महिलांना मासिक पाळीदरम्यान खूप वेदनांना सामोरे जावे लागते. अशावेळी काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या दुखण्यापासून सुटका मिळवू शकता.

मासिक पाळीत भयंकर वेदना होतात? या घरगुती उपायांनी झटपट मिळेल आराम
Follow us on

आजच्या खराब जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेषतः महिलांना दर महिन्याला चार ते पाच दिवस मासिक पाळीच्या असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. या दिवसं मध्ये त्यांना पोटदुखी, डोकेदुखी, क्रॅम्प्स, पाठदुखी, मूड चेंज अशा समस्यांमधून जावे लागते. खरं तर आजकाल खराब खाण्यामुळे आपली लाईफस्टाईल खूप बदली आहे. ज्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात समस्या वाढू लागतात. अनेकदा आपण अनेक महिलांना वेदना होऊ नये यासाठी औषधे घेताना पाहिले असेल. मात्र, ही औषधे आरोग्यास हानी पोहोचवतात. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या असह्य वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. विशेष म्हणजे तुम्हाला याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. चला जाणून घेऊया.

गरम पाण्याच्या पिशवीने शेक देणे

गरम पाण्याच्या पिशवीने पोटाला शेक दिल्याने पाठीच्या खालच्या भागाचे स्नायू शिथिल होतात. यामुळे रक्ताभिसरण ही सुधारते. क्रॅम्प्स कमी करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. तसेच याने वेदना देखील कमी होतात.

आले देखील गुणकारी

मासिक पाळीच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी आलं हा एक उत्तम उपाय आहे. दुखण्यात ताबडतोब आराम मिळवण्यासाठी आल्याचे काही तुकडे एक कप पाण्यात उकळून जेवणानंतर दिवसातून तीन वेळा प्यावे. यामुळे तुम्हाला तात्काळ आराम मिळेल.

हळदीचे दूध

हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे कोणतीही वेदना कमी करण्यास मदत करतात, जखमा देखील बरे करतात. मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद टाकून दूध उकळवून घ्या. त्यानंतर कोमट झाल्यावर यांचे सेवन करा. दरम्यान मासिक पाळीच्या वेदना कमी करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

ओवा देखील फायदेशीर

मासिक पाळीच्या काळात ओवा खूप फायदेशीर ठरू शकते. आजकाल महिलांमध्ये गॅस्ट्रिकची समस्या वाढल्याने पोटदुखीची समस्या उद्भवते. अशावेळी अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा मीठ कोमट पाण्यात मिसळून याचे सेवन केल्याने तात्काळ आराम मिळतो.

सैंधव मीठ आणि पाणी

सैंधव मिठाचे पाणी प्यायल्याने वेदनांपासून आराम मिळतो. तुम्ही जेव्हा मासिक पाळी दरम्यान एक ग्लास कोमट पाण्यात सेंधा मीठ पिता. यामुळे शरीराला आवश्यक खनिजे मिळतात आणि वेदना कमी होतात.

पपई वेदनाशमक

मासिक पाळीदरम्यान योग्य प्रवाह न झाल्याने बहुतेक महिलांना वेदनांची समस्या देखील उद्भवते. अशावेळी पपई हा रामबाण उपाय मानला जातो. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या दुखण्यापासून आराम मिळवायचा असेल तर पपई खा. यामुळे प्रवाह सुधारेल आणि वेदना कमी होतील.