मुलांची काळजी घेताना तुम्ही करत नाही ना ‘ ही ‘ चूक ? कॅन्सरसाठी ठरू शकते कारणीभूत

| Updated on: Aug 25, 2022 | 5:00 PM

आजकाल बरेच पालक एक चूक करताना दिसतात, आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत. अनेक संशोधनात हे नमूद करण्यात आले आहे आणि तज्ज्ञाांनीही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. ही सवय मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.

मुलांची काळजी घेताना तुम्ही करत नाही ना  ही  चूक ? कॅन्सरसाठी ठरू शकते कारणीभूत
Follow us on

आपल्या मुलांच्या संगोपनात (child care) कोणतीही कमतरता राहू नये, असा प्रयत्न सर्व पालकांकडून केला (Parenting) जातो. मुलांचा उत्तम विकास व्हावा यासाठी, तसेच त्यांना शिक्षणाची उत्तम संधी मिळावी, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी बहुसंख्य पालक आयुष्यभर कष्ट करतात. पालक हे कार्य प्रेमाने आणि जबाबदारीने करत असतात. आई-वडील निस्वार्थपणे त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात. मात्र कधी-कधी नकळतपणे त्यांच्याकडून अशी एखादी चूक घडते, जी त्यांच्या मुलांचे नुकसान करू शकते. बऱ्याच वेळेस पालकांना या गोष्टीची कल्पनाही नसते की त्यांच्याकडून चूक (mistakes) होत आहे. ही चूक वारंवार घडण्यामागचे कारण म्हणजे, त्याचा परिणाम उशीरा दिसून येतो. आजच्या या लेखाता आम्ही तुम्हाला अशा एका का चुकीबद्दल सांगणार आहोत, जी आजकाल बरेच पालक करताना दिसतात. ही सवय मुलांच्या आरोग्याच्या (health problem) दृष्टीने धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे कॅन्सरचा (कर्करोग) (cancer) धोकाही संभवतो. अनेक संशोधनात हे नमूद करण्यात आले आहे आणि तज्ज्ञाांनीही या गोष्टीचा उल्लेख केला आहे.

आजकालचे पालक करतात ही चूक –

आजच्या मॉर्डन युगात खाण्यापिण्याच्या सवयी खूप बदलल्या आहेत. अन्न शिजवण्यासाठी आजकाल लोक बऱ्याच पद्धतीचा वापर करताना दिसतात. त्यापैकीच एक पद्धत आहे, मायक्रोव्हेव वापरण्याची. अनेक पालक आपल्या मुलांसाठी जेवण बनवण्यापासून ते गरम करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी मायक्रोवेव्हचा वापर करताना दिसतात. यामुळे त्यांचे काम खूप सोपे होत असले तरी हे कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकते, असे अनेक संशोधनांतून समोर आले आहे. मायक्रोवेव्ह मधून उत्सर्जित होणाऱ्या लहरींमुळे त्यात शिजवलेले अथवा गरम केलेले अन्न हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

यासाठीही धोकादायक आहे मायक्रोवेव्ह –

मायक्रोवेव्ह विकत घेताना त्यासोबत एक किट येतो, ज्यामध्ये एक भांडे प्लास्टिकचे असते. बरेचदा पालक स्वत: त्या (प्लास्टिकच्या) भांड्यात अन्न गरम करून खातात , सोबतच आपल्या मुलांनाही त्यातील अन्न खाण्यास देण्याची चूक करतात. रिपोर्ट्सनुसार मायक्रोवेव्ह मुळे होणाऱ्या कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. प्लास्टिकच्या भांड्यात कोणताही अन्नपदार्थ गरम करून खाणे, हे धोकायदायक असते, त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते.

मुलांमध्ये दिसणारी कॅन्सरची लक्षणे –

मुलांमध्ये दिसणाऱ्या काही लक्षणांबाबतही पालकांनी सावध राहिले पाहिजे. रिपोर्ट्सनुसार सकाळी उलटी होणे,, दोन आठवड्यांहून अधिक काळ डोकं दुखणे, ताप, वजन कमी होणे, ॲंटीबायोटिक्सचा परिणाम न होणे, अशी काही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांना दाखवावे.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व सुचवण्यात आलेले उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )