‘या’ व्यक्तींनी जपून करावे आंब्याचे सेवन, अन्यथा होऊ शकतो त्रास

| Updated on: Aug 05, 2022 | 1:16 PM

आंबा हे असं फळ आहे, जे सर्वांनाच आवडतं. मनाला मोहवणारा केशरी- पिवळा रंग, मधुर चव यामुळ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व जण आंब्याचे चाहते असतात. आंब्याच्या सेवनामुळे मनाला आनंद तर मिळतोच पण त्याचे शरीरालाही अनेक फायदे होतात.

या व्यक्तींनी जपून करावे आंब्याचे सेवन, अन्यथा होऊ शकतो त्रास
Follow us on

फळांचा राजा असलेला ‘आंबा’ (Mangoes) सर्वांनाच आवडतो. मनाला मोहवणारा केशरी- पिवळा रंग, मधुर चव यामुळ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व जण आंब्याचे चाहते असतात. आंब्याच्या सेवनामुळे मनाला आनंद तर मिळतोच पण त्याचे शरीरालाही (beneficial for health) अनेक फायदे होतात. आंब्यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॉपर आणि फायबर अशी अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. मात्र आंब्याचे अति सेवन करणे (problems) तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे आंबा नेमका कधी आणि किती प्रमाणात खावा ? आंबा खाण्याची योग्य वेळ नेमकी कोणती ? रिकाम्या पोटी आंबा खाऊ शकतो का? शरीरावर त्याचे काही परिणाम होऊ शकतात का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.

आंब्यामुळे वाढते एनर्जी

‘डाएट इनसाइड’ च्या संस्थापक असणाऱ्या डाएटिशिअन लवलीन कौर यांनी एका वेबसाईटशी बोलताना आंब्याविषयी अनेक महत्वपूर्ण माहिती दिली. सकाली उठल्यावर रिकाम्या पोटी आंबा खाणं चुकीचं नसल्याचे त्यांनी सांगितले. आंब्यामुळे आपली एनर्जी वाढते, मात्र त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे चांगले नाही, असेही त्यांनी नमूद केले. ‘ रिकाम्या पोटी आंबा खाल्ला तर चालू शकतं. सकाळी आपल्या शरीराला अल्काइन पदार्थांची गरज असते, त्यामुळे सकाळी आंबट फळांऐवजी गोड फळं खाणं कधीही चांगलं असतं. मात्र जेवण झाल्यानंतर लगेच किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाऊ नये. कारण त्यावेळी आंब्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील, रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते,’ असे लवलीन यांनी सांगितले.

‘या’ व्यक्तींनी जपून करावे आंब्याचे सेवन

मधुमेहाचे रुग्णही आंबा जरूर खाऊ शकतात, मात्र त्यांनी थोडी काळजी घेणे अपेक्षित आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खाताना त्यासह नट्स, बिया यासारख्या फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे, असा सल्ला दिला जातो. हे दोन्ही एकत्र खाल्यास ग्लायसेमिक लोड संतुलित राहू शकतो. त्यासह मधुमेहाच्या रुग्णांनी सीझन सुरू झाल्या झाल्या येणारे आंबे खाऊ नयेत, कारण त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असे, असेही लवलीन यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा

बंगळुरू येथील क्लाऊडनाइन ग्रुप ऑफ हॉस्पिटलमधील चीफ क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट अभिलाशा यांनी आंब्याच्या सेवनाबद्दल माहिती दिली. सकाळी नाश्ता करताना आंबा खाणे हा एक चांगला पर्याय आहे. मात्र मधुमेह आणि IBS ( Irritable Bowel Syndrome) चा त्रास असणाऱ्या लोकांनी आंब्याचे सेवन करताना सावधानता बाळगावी. सकाळी तुम्ही स्मूदी किंवा लस्सीच्या माध्यमातून आंब्याचे सेवन करू शकता. संध्याकाळी आंब्याचा मिल्कशेक किंवा रात्री जेवणानंतर गोड म्हणून आंबा खाऊ शकता. मात्र त्याचे सेवन एका विशिष्ट प्रमाणातच करणे गरजेचे आहे. आंब्याचे अतिसेवन शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी तर या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळेच त्यांनी जेवणानंतर कधीच आंबा खाऊ नये.

आंब्याची क्वालिटीही महत्वाची

फंक्शनल न्युट्रिशनिस्ट मुग्धा प्रधान यांच्या सांगण्यानुसार, रिकाम्या पोटी आंबा खाणे योग्य असते. मात्र ज्यांना गंभीर इन्सुलिन रेझिस्टेंस किंवा हायपरग्लायसेमिया ( हाय ब्लड शुगर लेव्हल) याचा त्रास नसेल तेच लोक सकाळी रिकाम्या पोटी आंबा खाऊ शकतात. तसेच आंबा खाताना, तो नैसर्गिक पद्धतीने पिकवला गेला आहे की नाही , याची खात्री करून मगच त्याचे सेवन करावे. कृत्रिम पद्धतीने पिकवलेला आंबा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.