मुंबई: निरोगी आहाराची यादी तयार केली तर त्यात कडधान्यांचा समावेश नक्कीच होईल कारण त्यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात जी आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असतात. मूगडाळ अनेकदा खाण्याचा सल्ला दिला जातो. सामान्य डाळींव्यतिरिक्त स्प्राउट्सच्या स्वरूपात भिजवण्याचा ट्रेंड खूप जास्त आहे, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रत्येकाने मूगडाळ खाऊ नये कारण यामुळे आरोग्याला देखील हानी पोहोचू शकते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ म्हणाल्या की, या लोकांनी या डाळीचे सेवन करणे धोकादायक आहे.
जर तुमचा बीपी जास्त असेल तर डॉक्टर तुम्हाला मूगडाळ खाण्याचा सल्ला देतील, पण कमी ब्लड प्रेशरमध्ये परिस्थिती उलट असेल. ब्लड प्रेशर लो असेल तर तुम्ही मूगडाळ अजिबात खाऊ नये, अन्यथा समस्या वाढणारच.
जेव्हा तुम्ही काही कारणास्तव सूज येणे किंवा पोट फुगणे याला बळी पडता तेव्हा तुम्ही मूगडाळीपासून दूर राहावे कारण त्यात शॉर्ट चेन कार्ब असतात, ज्यामुळे पचनक्रियेत समस्या उद्भवू शकतात.
ज्या लोकांना रक्तात साखर कमी असते ते बरेचदा अशक्तपणा किंवा चक्कर येण्याची तक्रार करतात. अशावेळी मूगडाळ खाणे प्रचंड धोकादायक आहे. मूगडाळीमुळे रक्तातील साखरेची पातळी आणखी कमी होईल आणि मग तुम्ही बेशुद्ध होऊ शकता.
ज्या लोकांना युरिक ॲसिडचा त्रास आहे त्यांनी मूगडाळ खाणे टाळावे कारण यामुळे शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढू शकते आणि मग आपले सांधे दुखू लागतील, म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)