Piles: मूळव्याधाची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

| Updated on: Nov 16, 2022 | 11:33 AM

खराब जीवनशैली व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मूळव्याध ही एक सामान्य समस्या बनली आहे.

Piles: मूळव्याधाची समस्या दूर करण्यासाठी या गोष्टी ठरतील फायदेशीर
Follow us on

नवी दिल्ली – आजकाल व्यस्त आणि खराब जीवनशैलीमुळे तसेच खाण्यापिण्याच्या चुकीच्या (wrong eating habits) सवयींमुळे मूळव्याध (piles) ही एक सामान्य समस्या बनली आहे. या परिस्थितीत, व्यक्तीला मलत्याग करताना खूप त्रास होतो. काही वेळेस असह्य वेदनाही (pain) होतात. ज्या व्यक्तींना दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठतेची समस्या असते, त्यांना मूळव्याधाचा त्रास होऊ शकतो. हा एक अनुवांशिक आजारही आहे.

सोप्या भाषेत सांगायचे तर, जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला मूळव्याध असेल तर इतर लोकांनाही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. प्राथमिक स्तरावर औषधं घेणे आणि घरगुती उपचार यांच्या मदतीने मूळव्याधाचा त्रास दूर केला जाऊ शकतो. मात्र निष्काळजीपणा केल्यास या आजाराचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

मूळव्याधाचा त्रास दूर करायचा असेल तर प्रथम आपले राहणीमान, जीवनशैली तसेच आहार यांच्यात व्यापक सुधारणा केली पाहिजे. तसेच काही गोष्टींचा वापर केल्याने फायदा मिळू शकतो.

कोरफड
मूळव्याधाचा त्रास असेल तर कोरफडीचा वापर फायदेशीर ठरतो. कोरफडीचा गर किंवा जेल यांच्या वापराने मूळव्याधामुळे होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. मूळव्याधाची शस्त्रक्रिया केल्यानंतरही कोरफड जेल हे वापरासाठी दिले जाते. अनेक संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की कोरफड जेलकेल्याा वापर केल्याने त्वरित फायदे मिळतात. तसेच कोरफडीच्या जेलमध्ये हळद मिसळून त्याचा वापर केल्यासही फायदा मिळतो.

हळद
हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे मूळव्याधामुळे होणारी वेदना आणि जळजळ कमी करण्यास फायदेशीर ठरतात. त्यामुळेच मूळव्याधाचा त्रास असेल तर हळदीचा वापर योग्य ठरतो. मूळव्याधाचा त्रास असलेल्या रुग्णांनी रोज रात्री झोपण्यापूर्वी हळद घातलेले दूध पिणे फायद्याचे ठरते.

कांदा
मूळव्याधाच्या उपचारांसाठी कांदा हा देखील एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. कांद्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. कांद्याच्या रसाचे सेवन केल्याने मूळव्याधाचा त्रास कमी होण्यास लवकर मदत होते, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. मूळव्याधाने ग्रस्त असलेले लोक कांद्याच्या रसाचे सेवन करू शकतात. याच्या सेवनाने आराम मिळतो