नवी दिल्ली: शरीरामध्ये पोषक तत्वांची (nutrition) कमतरता असेल तर त्याचा परिणाम आरोग्य, त्वचा आणि केसांवर दिसून येतो. केस निरोगी ठेवण्यासाठी काळजी घेण्याबरोबरच शरीरात योग्य प्रमाणात पोषक तत्वं असणेही गरजेचे असते. येथे आपण कोंड्याबद्दल बोलत आहोत, जे केस गळण्याचे, तसेच ते कोरडे आणि निर्जीव होण्याचे कारण असू शकते. घाण, ओलावा, घाम आणि धूळ किंवा प्रखर सूर्यप्रकाश यामुळे केसात कोंडा होऊ शकतो. पण काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे (vitamin deficiency) देखील कोंडा (dandruff) होऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोंड्याची समस्या उद्भवू शकते. जाणून घेऊया..
व्हिटॅमिन बी 7 हे बायोटिन नावाने ओळखले जाते आणि स्काल्प निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरते. बायोटिनचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यामुळे आरोग्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते. या जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि केसांचे नुकसान होते. त्याची कमतरता दूर करण्यासाठी बदाम, मांस, मासे आणि संपूर्ण धान्याचे सेवन करावे.
त्वचेप्रमाणेच केसांच्या चांगल्या वाढीसाठी शरीरात कोलेजन असायला हवे. कोलेजनच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन सीचा उपयुक्त ठरते. शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर केस गळणे, कोंडा होणे, केस पातळ होणे, अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिनस सीच्या कमतरतेमुळे सेबोरिक हा त्वचारोग होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत कोंडा वाढू शकतो. व्हिटॅमिन सी शरीराला मिळावे यासाठी लिंबूवर्गीय आंबट फळांचे सेवन सरू करावे.
व्हिटॅमिन डी हे देखील हे एक आवश्यक जीवनसत्व देखील आहे, ज्याच्या कमतरतेमुळे केवळ हाडेच नव्हे तर केस देखील अशक्त होतात. व्हिटॅमिन डीची कमतरता हे कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीचे लक्षण आहे. आणि आपण सूर्यप्रकाशाद्वारे त्यावर मात करू शकतो.
तसे पाहिले तर कॉड लिव्हर ऑइल, मशरुम किंवा फॅटी फिशच्या माध्यमातूनही शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होऊ शकते. केसांची निगा राखण्याबरोबरच सामान्य जीवनातही बदल करायला हवेत. ताण-तणाव टाळायला हवा, कारण त्यामुळे केसांची समस्या सुरू होऊ शकते.