thyroid : थायरॉईडमध्ये कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या गोष्टी खाणे टाळावे? जाणून घ्या

| Updated on: Oct 06, 2023 | 2:22 PM

थायरॉईड या आजाराकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. थायरॉईडमध्ये आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो, त्यामुळे थायरॉईडमध्ये काय खावे आणि काय खाऊ नये याची माहिती तुम्हाला असायला हवी. थायरॉईड होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

thyroid : थायरॉईडमध्ये कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या गोष्टी खाणे टाळावे? जाणून घ्या
Image Credit source: freepik
Follow us on

thyroid disease : अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे हे थायरॉईडचे प्रमुख लक्षण मानले जाते. थायरॉईड ( Thyroid Disease ) आता एक सामान्य आजार झाला आहे. पण याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. थायरॉईडमुळे तणाव, झोप न येणे, चिंता या सारखे लक्षणं देखील दिसतात. थायरॉईड हा अनुवांशिकता, हार्मोनल असंतुलन, आयोडीनची कमतरता किंवा तणाव यांसह अनेक कारणांमुळे होऊ शकतो. थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी व्यायाम आणि आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. थायरॉईड झाल्यास काय खावे आणि काय खाऊ नये हा प्रश्न येतो. आम्ही तुम्हाला याबाबतच आता माहिती सांगणार आहोत.

थायरॉईड ( Thyroid ) म्हणजे काय?

वैद्यकीय भाषेत थायरॉईड म्हणजे हायपोथायरॉइडिझम. आपल्या घशात फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी असते ज्याला थायरॉईड म्हणतात. जेव्हा थायरॉक्सिन (T4) आणि ट्रायओडोथायरोनिन (T3) हे महत्त्वाचे संप्रेरक योग्यरित्या तयार होत नाहीत, तेव्हा थायरॉईड रोग होतो.

तज्ञ काय सांगतात

डॉ. दीपक कुमार सुमन सांगतात की थायरॉईड होण्याची अनेक कारणे आहेत. आहाराव्यतिरिक्त शरीरात सूज आल्यानेही ही समस्या उद्भवते. एक काळ असा होता की हा आजार 50 ते 60 वयोगटातील लोकांना होत असे, पण आता तो लहान वयातच अनेक लोकांना होतांना दिसत आहे.

थायरॉईडमध्ये काय खावे

जर तुम्हाला थायरॉईड असेल तर अंडी, नट, संपूर्ण धान्य खाऊ शकता. पण ते जास्त प्रमाणात खाऊ नयेत. अंड्यांमध्ये सेलेनियम असते जे थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करते. काजू खाल्ल्याने हार्मोनल संतुलन सुधारण्यासही मदत होते. जर एखाद्याला अशक्तपणा वाटत असेल तर त्याने संपूर्ण धान्यापासून बनवलेल्या वस्तू खाव्यात.

थायरॉईडमध्ये काय खाऊ नये

सोयाबीन किंवा डाळीमध्ये भरपूर प्रथिने असतात. थायरॉईडमध्ये प्रथिनांचे सेवन मर्यादित असावे. तुम्हाला हा आजार असल्यास आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी आणखी वाढू शकते. कॉफी, चॉकलेट, ब्रोकोली आणि फुलकोबी खाणे टाळले पाहिजे. या पदार्थांमध्ये थायरॉईडला उत्तेजीत करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे हा आजार वाढू शकतो.