मुंबई : टॉन्सिल्स् (टॉन्सिलिटिस) ही घशाच्या मागील बाजूस असलेल्या दोन अंडाकृती गाठींची (ऊतकांची) वेदनादायक स्थिती आहे. टॉन्सिलचे मुख्य कार्य (The main function of the tonsils) म्हणजे श्वासोच्छ्वासातून येणारे जिवाणू किंवा विषाणूंचा प्रतिबंध करणे होय. टॉन्सिलमध्ये असलेले अँटीबॉडीज घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गास प्रतिबंध करण्याचे कार्य करतात. तथापि, काही संसर्गजन्य परिस्थितीमध्ये, त्यांच्यावर सूज येते, ज्यामुळे खाणे आणि पिणे देखील कठीण होते. लहान मुलांमध्ये ही समस्या खूप सामान्य आहे. टॉन्सिल्सच्या जळजळ मुळे घसा खवखवणे, गिळण्यास त्रास (Difficulty swallowing) होणे, वेदना आणि ताप येऊ शकतो. ही समस्या कोणालाही होऊ शकते, ही समस्या लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये अधिक दिसून येते. जर, तुम्हाला टॉन्सिलिटिसचा त्रास वारंवार होत असेल तर या संदर्भात तज्ञांना भेटणे आणि स्थितीचे योग्य निदान (Correct diagnosis) करणे खूप महत्त्वाचे आहे. टॉन्सिलिटिसच्या समस्येबद्दल अधिक तपशीलवार जाणून घेऊया.
मायोक्लिनिकच्या अहवालानुसार घशातील या ऊतींना विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे सूज येऊ शकते. टॉन्सिलिटिसचे मुख्य कारण म्हणजे स्ट्रेप्टोकोकस पायोजेनेस (ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकस) नावाचा जिवाणू, ज्यामुळे स्ट्रेप थ्रोट देखील होतो. ही समस्या गंभीर नसली तरी नेहमीच्या उपचाराने ती बरी होऊ शकते, मात्र टॉन्सिलिटिसची समस्या वारंवार जाणवत राहिल्यास त्याबाबत तज्ज्ञांचे मत घेणे अत्यंत गरजेचे आहे.
टॉन्सिलिटिसच्या स्थितीमुळे घशात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, ज्याबद्दल सर्वांनीच विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. सर्वसाधारणपणे, टॉन्सिलिटिसच्या बाबतीत अशा समस्या जाणवू शकतात.
टॉन्सिलिटिसच्या बाबतीत, जळजळ सामान्य औषधांनी बरे होऊ शकते. तथापि, जर तुम्हाला अशा प्रकारची समस्या वारंवार येत असेल तर ते रोखणे खूप आवश्यक आहे. टॉन्सिलिटिस टाळण्यासाठी, तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय या गोष्टी लक्षात ठेवल्यास टॉन्सिलिटिसपासूनही बचाव होऊ शकतो.
>> हात स्वच्छ ठेवा जेणेकरून अन्नातून घशाचा संसर्ग होणार नाही.
>> अन्न, पाण्याचे ग्लास किंवा बाटल्या कोणाशीही शेअर करणे टाळा.
>> टॉन्सिलिटिसचे निदान झाल्यानंतर तुमचा टूथब्रश बदला.
>> मुलांना जिवाणू किंवा विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण करण्याच्या उपायांबद्दल शिकवा.
>> जर तुम्ही टॉन्सिलिटिसच्या स्थितीबद्दल अधिक संवेदनशील असाल, तर नक्कीच याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या.