कोरोना काळापासून सर्वांच्याच ‘वर्क कल्चर’ (Work culture) मध्ये बराच फरक पडलेला आहे. अनेक जण अजूनही घरातूनच आपले काम करीत आहे. सतत बसून काम केल्याने तसेच वेळेच्या अभावी जे मिळेल ते खाल्ल्यामुळे याचा शरीरावर दुष्परिणाम होत आहे. काही लोकांचे वेळापत्रक इतके व्यस्त असते की ते त्यांच्या आरोग्याकडे पाहिजे तितके लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना वेळेपूर्वीच अनेक आजार जडतात. ज्या लोकांचे ‘शेड्यूल’ (Schedule) खूप व्यस्त असते किंवा ते काही कारणाने त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत, अशा लोकांचे वजन झपाट्याने वाढत असते. तासंतास एकाच जागी बसून राहणे आणि योग्य व सकस आहाराचे नियोजन न करणे यामुळे लठ्ठपणाची (Obesity) समस्या निर्माण होत असते. वजन वाढल्यामुळेही उच्चरक्तदाब, ह्रदयरोग आदींसारख्या समस्या निर्माण होत असतात.
चुकीचा आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे लोकांना पोटाच्या समस्या निर्माण होत असतात. वजन कमी करण्यासाठी पहिल्यांदा शरीराचे पाचन तंत्र चांगले असणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, पचनक्रिया सुधारण्यासाठी अशा गोष्टींचे सेवन केले पाहिजे, ज्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. जर तुम्ही योग्य प्रमाणात फायबरचे सेवन करत असाल, तर त्यामुळे पोट स्वच्छ होईल आणि निरोगीही राहाल. फायबर घेतल्याचा फायदा म्हणजे पोट भरलेले राहते आणि जास्त वेळ भूक लागत नाही.
असे दिसून आले आहे, की व्यस्त वेळापत्रक असलेले बहुतेक लोक अति खाण्याचे बळी ठरतात. जर तुम्ही जास्त शारीरिक हालचाली करत नसाल तर चुकूनही जास्त खाऊ नका. या पद्धतीमुळे तुमचे वजन एकावेळी दुप्पट होऊ शकते. यामुळे केवळ वजन वाढत नाही तर तुम्हाला अनेक आजारांचा धोकाही निर्माण होतो. प्रमाणात खाल्लं तर शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
अनेक वेळा लोकांना कामामुळे थकवा जाणवतो आणि ते मर्यादेपेक्षा जास्त झोपू लागतात. तज्ज्ञांच्या मते, जास्त झोपणे हे देखील वजन वाढण्याचे एक कारण आहे. त्याऐवजी 7 ते 8 तास झोपणे चांगले. असं म्हणतात, की जास्त झोपूनही शरीरात थकवा राहतो. त्याऐवजी पुरेशी झोप घ्या. एवढेच नाही तर झोप कमी झाली तर ते हानिकारकही ठरू शकते. असे केल्याने शरीरात अधिक ऊर्जा खर्च होईल आणि तुम्हाला खाण्याची तीव्र इच्छा होईल.
आई शप्पथ! एका वर्षात भारतीय इतकी साखर फस्त करतात
तुम्हाला वारंवार भूक लागते का?, सावध व्हा… तुम्हाला मधुमेह असू शकतो!