मुलांच्या दुबळेपणाची चिंता करू नका, ‘या’ उपायांनी वाढवा वजन!

| Updated on: Sep 23, 2022 | 12:05 PM

काही मुलं जन्मापासून अशक्त असतात आणि बऱ्याच काळापर्यंत त्यांचं वजन वाढत नाही. मुलं जर दुबळी असतील, तर त्याबद्दल चिंता करू नका, उलट त्यावर काही उपाय करा.

मुलांच्या दुबळेपणाची चिंता करू नका, या उपायांनी वाढवा वजन!
मुलांच्या दुबळेपणाची चिंता करू नका, 'या' उपायांनी वाढवा वजन!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: तुमचं मूल दुबळं आहे (children) का आणि त्याच्या या अवस्थेमुळे तुम्ही बऱ्याचदा दु: खी असता का? मुलांची रोगप्रतिकारशक्ती (immunity) क्षीण असते, अशा परिस्थितीत पालकांनी त्यांची अधिक काळजी घ्यायला हवी. काही मुलं जन्मापासून अशक्त असतात आणि बऱ्याच काळापर्यंत त्यांचं वजन (underweight kids) वाढत नाही. मुलं जर दुबळी असतील, तर त्याबद्दल चिंता करू नका. हे उपाय करून तुम्ही तुमच्या मुलांचं वजन वाढवू शकता.

खाण्याची सवय लावा : मुलांचं वजन न वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या आहाराचा अभाव, हे असतं. त्यासाठी पालकांनी मुलांना सर्व पदार्थ खाण्याची सवय लावायला हवी. काही वेळा मुलांशी गोड बोलून, गप्पा मारत, एखादं आमिष दाखवत त्यांना खायला घालू शकता. हळूहळू मुलं स्वतःच पदार्थ खाण्यास सुरुवात करतील.

कॅलरीज वाढवा : ज्या मुलांचं वजन वाढत नाहीये, त्यांच्या आहारात कॅलरीजचं सेवन वाढायला हवं. पालकांनी मुलांना जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाण्यास द्यावेत. त्यासाठी मुलांना फॅट, चरबी, असलेले पदार्थ तसेच दुग्धजन्य पदार्थ, मलई किंवा चीज सारखे उच्च-कॅलरीयुक्त पदार्थ देऊ शकता.

हे सुद्धा वाचा

अशा पद्धतीने खायला द्या : मुलं पदार्थांच्या चवीसोबतच आवडता- नावडता पदार्थ पण ठरवत असतात. त्यामुळे मुलांना प्रथम तो पदार्थ खायला द्याव, जो त्यांना आवडतो. मात्र याचा अर्थ असा नव्हे की त्यांना बाहेरचे पदार्थ खाण्यास द्यावे. खाण्याच्या पद्धतींबद्दल बोलायचं झालं तर त्यासाठी एक युक्तीही आहे. मुलाला केळं मॅश करून खायला आवडत असतील तर त्याला असं केळं खायला द्या.

सप्लीमेंट्स : काही मुलांना बऱ्याच वेळेस भूक न लागण्याचा प्रॉब्लेम असतो. त्यांची भूक वाढवण्यासाठी तुम्ही काही सप्लीमेंट्सची मदत घेऊ शकता. बाजारात अशी अनेक औषधं किंवा सप्लीमेंट्स आहेत, ज्याचे काही दुष्परिणाम नसतात. व त्याचा फायदाही लवकर होतो. मात्र असे कोणतेही औषध किंवा सप्लीमेंट देण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.