Mouth Ulcer: ‘या’ 3 पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होतो तोंड येण्याचा त्रास , घरच्या घरी करा हे उपाय

| Updated on: Nov 21, 2022 | 3:12 PM

ज्या लोकांना वारंवार तोंड येण्याचा त्रास होत असेल त्यांनी ही समस्या गंभीरपणे हाताळली पाहिजे, कारण हे पचनतंत्राशी संबंधित गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.

Mouth Ulcer: या 3 पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होतो तोंड येण्याचा त्रास , घरच्या घरी करा हे उपाय
Follow us on

नवी दिल्ली – तोंडात फोड (Mouth Ulcer) येण्याची समस्या खूप वेदनादायक असते, परंतु यामुळे लोकांमध्ये चिडचिडेपणा निर्माण होतो. तोंड येणे किंवा तोंडात फोड येण्याची समस्या असल्यास कोणताही गरम, तिखट, खारट किंवा मसालेदार पदार्थ खाताना वेदना (pain) होतात. काहीही खाणे कठीण होते. हे फोड एखाद्या व्यक्तीच्या तोंडात अथवा जीभ, हिरड्या किंवा ओठांवरही येऊ शकतात. तोंड आल्यामुळे जळजळ तर होतेच पण अन्नपदार्थ खाणे किंवा चहा-कॉफी पिणेही अतिशय (cannot eat or drink easily) कठीण होते.

साधारणत: तोंडात येणारे हे फोड आठवड्याभरात बरे होतात. पण ज्या लोकांना वारंवार तोंड येण्याचा त्रास होत असेल त्यांनी ही समस्या गंभीरपणे हाताळली पाहिजे, कारण हे पचनतंत्राशी संबंधित गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. त्याच वेळी, तोंडाच्या स्वच्छतेशी संदर्भात होणारी चूक आणि स्वच्छतेशी संबंधित चुका आणि फॉलिक ॲसिड, झिंक (जस्त) आणि व्हिटॅमिन बी 12 यासारख्या पोषक तत्वांचा अभाव असल्यासदेखील तोंडात अल्सर होऊ शकतो.

आयुर्वेदिक औषधे आणि घरी सहज उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक घटकांच्या मदतीने,आपण या अल्सरवर उपचार करू शकतो.

हे सुद्धा वाचा

हळदीचा लेप लावा

हळद ही अतिशय औषधी असते. त्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल व अँटी-फंगल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हळदीचा वापर केल्याने तोंडात येणारे फोड आणि संसर्गापासून मुक्ती मिळू शकते. हळदीचा लेप लावल्याने तोंडातील फोडाचा त्रास कमी होतो व वेदनाही कमी होतात. त्यासाठी थंड पाण्यात हळदीची पावडर मिक्स करून एक पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट फोड आलेल्या जागी लावावी. दिवसातून 3 ते 4 वेळा हा उपाय करावा. वेदनांपासून आराम मिळेल.

मधाचा वापर करा 

मध लावल्याने तोंडातील फोडांचा त्रास आणि जळजळ कमी होण्यास मदत होऊ शकते. तोंडात फोड अथवा अल्सर आल्यास एका वाटीत थोडा मध घेऊन तो त्या फोडावर लावावा. थोड्या-थोड्या वेळाने हे करत रहावे. मात्र मध लावल्यानंतर तोंडात तयार झालेली लाळ बाहेर फेकावी. या उपायामुळे काही दिवसांतच वेदना कमी होतील.

या सर्व उपयांसोबतच तोंड येऊ नये म्हणून इतर काळजी घेणेही गरजेचे आहे. पुरेसे पाणी प्यावे, सकस व पौष्टिक अन्न खावे, मसालेदार पदार्थ कमी खावेत तसेच हलका व्यायामही करावा. यामुळे पचनसंस्थेला आराम मिळेल व तोंडाच्या अल्सरची समस्याही कमी होईल.

(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)