जेवणाची चव वाढवणारा कांदा (Onion) हा आरोग्यााठी तर चांगला असतोच पण आपली त्वचा आणि केसांसाठीही (good for health, skin and hair) अनेक प्रकारे उपयोगी ठरतो. कांद्यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे हळूहळू केस गळणे कमी होते व बंद होते. कांद्याचे अनेक फायदे आहेत. बाजारात आजकाल अनेक अशी उत्पादने मिळत आहेत, ज्यामध्ये (Onion based) कांद्याचा वापर केलेला असतो. कांद्याचे गुणधर्म असलेले तेल, शांपू, हेअर मास्क अशी अनेक उत्पादने बाजारात मिळतात. पण कांदा हा केवळ केसांसाठीच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठीही उत्तम मानला जातो. तो प्रकृतीने थंड असतो, त्यामुळे त्याच सेवन, (विशेषत: उन्हाळ्यात) लाभदायक ठरते.
कांद्यामुळे सर्दी- खोकला (cough & cold) यांपासूनही आराम मिळतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? कांद्यामध्ये ॲंटी-ॲलर्जिक, ॲंटी-ऑक्सीडेंट आणि ॲंटी- कार्सिनोजेनिक गुण असतात. याच कारणामुळे तुम्ही ॲंटी-बायोटिक औषधांचे सेवन न करता, व्हायरल सारख्या समस्यांवर मात करू शकता. कांद्यातील काही गुणधर्म हे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचेही काम करतात. सर्दी-खोकल्याच्या त्रास दूर करायचा असेल तर कांद्याचा वापर करता येईल. येथे आम्ही तुम्हाला काही असे उपाय सांगू, ज्यामुळे तुमचा सर्दी-खोकल्याचा त्रास सहज दूर होईल. तज्ज्ञांच्या मते, या पद्धतींचा अवलंब केल्यास तीन दिवसांत तुम्हाला बरं वाटेल.
तुम्हाला सर्दी किंवा खोकला झाला असेल तर तुम्ही कांद्याच्या रसाचे सेवन करून हा त्रास दूर करू शकता. त्यासाठी तुम्हाला कांदा व लिंबाच्या रसाचा उपयोग करावा लागेल. एका भांड्यात कांद्याचा रस काढून घ्या व त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर त्यामध्ये थोडा मध घालावा. हे तयार झालेले मिश्रण दिवसातून 2-3 वेळा प्यावे. काही तासांतच तुम्हाला फरक दिसून येईल.
सर्दी-खोकल्याची समस्या दूर करायची असेल तर तुम्ही कांद्याचे सिरप पिऊ शकता. हे सिरप तयार करण्यासाठी, एका भांड्यात कांद्याचा रस घेऊन त्यात कमीत कमी 2 चमचे मध मिसळावा व ते मिश्रण थोडा वेळ तसेच ठेवावे. दिवसभरात 4-4 तासांच्या अंतराने हे मिश्रण थोडे-थोडे प्यावे. हे सिरप तुम्ही स्टोअरही (साठवून) करू शकता. मात्र ते जास्त दिवस ठेऊ नये.
सर्दी-खोकला होत असेल तर आपण बहुतांश वेळा गरम पाण्याची वाफ घेतो, तो एक उत्तम उपाय ठरतो. डॉक्टरही आपल्याला वाफ घेण्याचा सल्ला देतात. सर्दी झाल्यामुळे बरेच वेळा आपले नाक चोंदले जाते आणि छातीतही कफ साठलेला असतो. ज्यामुळे आपल्याला अस्वस्थ तर वाटतेच पण खोकलाही सुरू होतो. अशा वेळी वाफ घेताना तुम्ही त्यात कांद्याचे थोडे तुकडेही टाकू शकता. 5-10 मिनिटे वाफ घेऊन त्यानंतर थोडा वेळ पांघरुण घेऊन पडून रहावे. थोड्या वेळाने तुम्हाला बरं वाटेल.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.