मुंबई : मासिक पाळीमध्ये तीन ते चार दिवस महिलांना खूप त्रास होतो. या दरम्यान शरीरात हार्मोन्स बदलतात. यामुळे पोटदुखीसोबतच मूड स्वींग,चिडचिडेपणा,भावूक होणे, खूप राग येणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. पोटदुखी, वेदना घरगुती उपायांनी कशातरी शमतात. पण मूड स्वींगचा उपाय काय करावे हे मात्र समजत नाही. अशावेळी मूड स्वींगचा सामना करण्यासाठी काही उपाय तुम्हाला नक्कीच मदत करतील.
ब्रीदींग एक्ससाईज करा:
मासिक पाळीमध्ये अवघड व्यायाम करण्यास मनाई आहे. पण तुम्ही बसल्या बसल्या ब्रीदींग एक्ससाईज करू शकता. यामुळे तुमच्या मेंदूमध्ये अॉक्सिजन पुरवठा व्यवस्थित होतो. हलकाफुलक्या व्यायामाने शरीरात एंडोर्फिन हार्मोनचा स्राव वाढतो. यामुळे तुमचा मूड चांगला राहतो.
मेडिटेशन उपयुक्त
स्ट्रेस लेव्हल कमी करण्यासाठी मेडिटेशन खूप उपयुक्त आहे. पीरीयडमध्ये सकाळी आणि सायंकाळी मेडिटेशन नक्की करा. यामुळे यामुळे तुम्हाला छान आणि शांत वाटेल. आतून प्रसन्न आणि सकारात्मक वाटेल.
आवडीचे काम करा
या काळात मेंदूला दुसऱ्या गोष्टीकडे परिवर्तित करा. मासिक पाळीमध्ये मेंदूला चांगल्या गोष्टीकडे परावर्तित करा. यासाठी आवडीच्या गोष्टी,छंदाला वेळ द्या. जसे लिखाण, पेंटिंग,गाणे गा किंवा आवडीच्या कामात स्वतःला वेळ द्या. यामुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल आणि तुमचा मूडही चांगला होईल.
वॉक करा
मासिक पाळीच्या दिवसात वॉक करणे अर्थात चालण्याची सवय तुमच्या मेंदूला डायव्हर्ट करतात. शक्य असेल तर वॉकसाठी कुणाला सोबत न्या. चालताबोलता व्यायाम होतो आणि तुम्हालाही मोकळे वाटेल. तुमचा मूड चांगला होईल. नकारात्मक व्यक्तींपासून जरा अंतर ठेवून रहा. ज्यांच्याशी बोलल्याने तुम्हाला छान वाटते अशाच लोकांशी बोला.
हेल्दी डाएट आवश्यक
आपल्या डाएटमध्ये साखर आणि कमी कार्बोहायड्रेटचे पदार्थांचा समावेश करा. तळलेले-भाजलेल्या पदार्थाला जरा बाजूला ठेवा. फळ, नारळ- पाणी, ज्यूस घ्या. यामुळे एनर्जी मिळेल आणि मूड चांगला होईल.
संबंधित बातम्या