मुंबई : गरोदर असताना वाढलेले वजन बाळंतपणानंतरही लवकर कमी होत नाही. डिलिव्हरी (Pregnancy) नॉर्मल झाल्यावर महिला ताकद यावी म्हणून तूपाचे लाडू आणि खूप कँलरीज असलेले पदार्थ खातात. अशावेळी वजन नियंत्रित करणे अवघड आहे. डिलिव्हरीसाठी सिझेरियन झाले असेल तर पोट पुढे यायला सुरूवात होते. म्हणजे डिलिव्हरी कशीही असो वजनाचा काटा पुढे गेल्याने महिला चिंतेत असतात. तुम्ही पण असा विचार करत असाल तर हा तुमचा भ्रम आहे. डिलिव्हरीनंतरही तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता. अर्थात यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार.
डिलिव्हरीनंतरचे वजन कमी करण्याच्या खास टिप्स-
ओव्याचे पाणी :
ओव्याचे पाणी वजन नियंत्रण आणि पोट कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाकून पाणी उकळून घ्या. नंतर पाणी गाळून घ्या प्या. यामुळे पोटातील गँस कमी होतात. हे पाणी दिवसभर पिता येते. हे शक्य नसेल तर जेवणानंतर दोन्ही वेळा हे पाणी प्या.
फिगर खराब होण्याच्या भीतीपोटी महिला मुलांना स्तनपान करणे टाळतात. पण स्तनपान केवळ मुलांसाठी नव्हे तर आईसाठी आवश्यक आहे. स्तनपानामुळे वजन कमी होण्यास मदत होते असे अभ्यासात नमूद आहे.
जायफळचे दूध वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. यासाठी एक कप दुधात एक चतुर्थांश जायफळ पावडर टाकून हलवून दूध कोमट करा. यासोबतच फायबरयुक्त आहार घ्या.
बाळंतपणानंतर 9 महिने अवघड व्यायाम करण्यास मनाई आहे. विशेषतः सिजेरियन झाले असेल तर खास काळजी घ्यावी लागते. पण तुम्ही वॉक करू शकता. कमीत कमी सकाळी आणि रात्री जेवणानंतर काही वेळ चालणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल.
इतर बातम्या :
…अशी प्रतिकारशक्ती निर्माण झाली तर कोरोना काही बिघडवू शकणार नाही… ICMR चा दावा
मासिक पाळीत होणाऱ्या मूड स्वींगचा ‘असा’ करा सामना
Omicron : ओमिक्रॉन होऊन गेला असेल तर घाबरू नका, ICMR चा स्टडी काय सांगतो? वाचा सविस्तर