रात्री झोपताना इयरबड्स वापरता का? तोटे वाचा

| Updated on: Jul 19, 2023 | 1:56 PM

जर तुम्हीही असं करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण अधूनमधून इयरबड्स घालून झोपायला काहीच हरकत नाही, पण जर तुम्ही रोज असं केलं तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं.

रात्री झोपताना इयरबड्स वापरता का? तोटे वाचा
using earbuds while sleeping
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: आजकाल बहुतेक लोक इयरबड्स घालून झोपतात. मोबाईल फोनचा वापर करतात. जर तुम्हीही असं करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण अधूनमधून इयरबड्स घालून झोपायला काहीच हरकत नाही, पण जर तुम्ही रोज असं केलं तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं.

रात्री इयरबड्स लावून झोपण्याचे तोटे

ऐकू कमी यायला लागतं

जर एखादी व्यक्ती रात्रभर कानात इयरबड्स लावून गाणी ऐकत असेल तर त्याचा त्याच्या कानांच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो. जर एखादी व्यक्ती दररोज असे करत असेल तर कान दुखण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तुम्हीही रोज कानात इयरबड्स घालून झोपत असाल तर सावध गिरी बाळगा.

बीप असा आवाज कानात ऐकू येतो

आजकाल बहुतेक लोक गॅजेट्स वापरतात पण तुम्हाला माहित आहे का की ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवण्याचंही काम करतात. त्याचबरोबर अनेक जण घराबाहेर पडताच इयरबड्सच्या माध्यमातून गाणी ऐकतात, पण तसे केल्याने तुमचा ताण वाढतो. कानात सतत इयरबड्स घातले तर बीप असा आवाज कानात ऐकू येतो. या समस्येवर कोणताही इलाज नाही.

कानात मळ साचतो

ही एक नैसर्गिक समस्या आहे. परंतु जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ इयरबड्स वापरत असेल तर यामुळे कानाचा मळ आतल्या दिशेने सरकू शकते, जे कानासाठी हानिकारक ठरू शकते. इतकंच नाही तर इयरबड्समुळे तुम्हाला खाज येणे आणि कोरडेपणा येऊ शकतो.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)