मुंबई : भेसळयुक्त खाद्यपदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. सध्याच्या काळात बाजारामध्ये अनेक पदार्थ भेसळयुक्त आहेत. त्याचे आपण सेवन केल्याने आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. भेसळयुक्त पदार्थ ओळखण्यासाठी अनेक प्रकारचे संशोधने केली जात आहेत. मात्र, नुकताच FSSAI ने एका व्हिडीओव्दारे भेसळयुक्त पदार्थ ओळखण्यासाठी काही सोप्पा टिप्स सांगितल्या आहेत. Video shared by FSSAI to identify adulterated cooking oil
या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले की, आपण बाजारातून आणलेल्या तेलामध्ये भेसळ आहे की नाही हे कसे ओळखायचे. यासाठी तुम्ही एक चमचा तेल घ्या. आता या तेलामध्ये 4 मिली वॉटर मिक्स करा. त्यानंतर टेस्ट ट्यूबमध्ये दोन थेंब टाका. जर तुमच्या तेलात भेसळ नसेल तर वरती कोणताच रंग येणार नाही. पण जर तुम्ही आणलेले तेल हे भेसळयुक्त असेल तर वरती आम्लाचा रंग बदलेल.
Detecting prohibited colour like metanil yellow Adulteration in Oil#DetectingFoodAdulterants_5#AzadiKaAmritMahotsav@jagograhakjago @mygovindia @MIB_India @PIB_India @MoHFW_INDIA pic.twitter.com/hFYqIwLHJ7
— FSSAI (@fssaiindia) September 8, 2021
तेलामध्ये मेटॅनिल असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिरकारक आहे. तज्ञांच्या मते, मेटॅनिल हा विनापरमिट खाद्य रंग आहे, जो भारतात मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, मेटॅनिल मानवांना खाण्यासाठी योग्य नाही आणि त्याचे विपरित परिणाम मानवी शरीरावर होतात. विशेष म्हणजे भेसळयुक्त तेलाचा रंग बदलतो. यामुळे आपण नेहमी तेलाच्या रंगावर लक्ष ठेवले पाहिजे.
सामान्यत: बाजारात विकल्या जाणाऱ्या डाळींचा रंग टिकवण्यासाठी त्या ‘मेन्टील यलो पेंट’ने रंगवल्या जातात. त्याची तपासणी करण्यासाठी आपल्याला हायड्रोक्लोरिक अॅसिडची आवश्यकता असते. चाचणीसाठी थोडी मसूर डाळ घेऊन ती पाण्यात टाका आणि त्या पाण्यात हायड्रोक्लोरिक अॅसिडचे चार थेंब घाला. जर, मसूर डाळीमध्ये भेसळ केली तर पाण्याचा रंग लाल होईल. असे आढळल्यास सावधगिरी बाळगा अन्यथा मूत्रपिंडासंबंधित समस्या किंवा पाचन तंत्राचा त्रास होऊ शकतो.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Video shared by FSSAI to identify adulterated cooking oil)