Vitamin B12 मिळविण्यासाठी 5 पदार्थ
निरोगी प्रौढ व्यक्तीला दररोज सुमारे 2.4 मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी 12 ची आवश्यकता असते. जर आपल्याला ही पोषक तत्वे मिळाली नाहीत तर अशक्तपणा, थकवा, भूक न लागणे, उलट्या, अतिसार, वजन कमी होणे, हात-पाय सुन्न होणे अशा समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे शरीर खूप कमकुवत होते.
मुंबई: आपल्या शरीराच्या विकासासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते, जी पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आहार घ्यावा लागतो. या आवश्यक पोषक घटकांपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन बी 12, ज्याच्या कमतरतेमुळे आपले बरेच नुकसान होऊ शकते. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्टने सांगितले की, निरोगी प्रौढ व्यक्तीला दररोज सुमारे 2.4 मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी 12 ची आवश्यकता असते. जर आपल्याला ही पोषक तत्वे मिळाली नाहीत तर अशक्तपणा, थकवा, भूक न लागणे, उलट्या, अतिसार, वजन कमी होणे, हात-पाय सुन्न होणे अशा समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे शरीर खूप कमकुवत होते. चला जाणून घेऊया या व्हिटॅमिनची गरज पूर्ण करण्यासाठी आपण कोणते पदार्थ खावेत.
Vitamin B12 मिळविण्यासाठी 5 पदार्थ
- आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे अंड्याशिवाय नाश्ता अपूर्ण असतो. प्रथिने, नैसर्गिक चरबी व्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी 12 देखील भरपूर प्रमाणात यात आढळते. अंड्याच्या पांढऱ्या भागापेक्षा पिवळ बल्क खाल्ल्याने अधिक बी 12 मिळेल.
- सॅल्मन हा एक मासा आहे जो ताज्या आणि खाऱ्या दोन्ही पाण्यात आढळतो, व्हिटॅमिन बी 12 व्यतिरिक्त, प्रथिने आणि ओमेगा -12 फॅटी ॲसिड देखील भरपूर प्रमाणात यात उपलब्ध आहेत.
- आपल्या सर्वांना माहित आहे की मांसामध्ये भरपूर प्रथिने आणि चरबी असते जी आपल्या शरीराच्या विकासासाठी आवश्यक असते, परंतु आपल्याला माहित आहे का की मांसाहार व्हिटॅमिन बी 12 चा समृद्ध स्त्रोत देखील आहे. हे खाल्ल्याने शरीराला दररोज लागणाऱ्या व्हिटॅमिन बी 12 पेक्षा जास्त व्हिटॅमिन बी 12 मिळते, म्हणून मांस मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे.
- टूना मासा हा एक समुद्री मासा आहे, त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यासारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात, तसेच व्हिटॅमिन बी 12 चा देखील हा एक चांगला स्रोत आहे. हा एक महागडा मासा आहे जो जपानमध्ये खूप आढळतो.
- व्हिटॅमिन बी 12 दूध आणि सर्व दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. यासाठी तुम्ही रोजच्या आहारात दुधा व्यतिरिक्त चीज आणि दहीचाही समावेश करू शकता. भारतासारख्या देशात दुधाची कमतरता नाही.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)