मुंबई: निरोगी आयुष्य जगण्यासाठी शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजांची आवश्यकता असते. जर आपल्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर आपल्या शरीरात अनेक गंभीर आजार होऊ शकतात. बरेच लोक व्हिटॅमिन सी ची कमतरता अगदी हलकेपणाने घेतात. परंतु व्हिटॅमिन सी देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. अशात जर तुम्हाला व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर तुम्हाला कोणत्या समस्या येऊ शकतात ते जाणून घेऊया.
व्हिटॅमिन सी मुळे शरीराला आजारांशी लढण्याची ताकद मिळते. हे आपली त्वचा, रक्तवाहिन्या, हाडे मजबूत ठेवते. जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा अनेकदा आपले लक्ष फक्त आजारावर असते. पण व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. अशावेळी जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त वेळा आजारी पडत असल्याचं वाटत असेल तर व्हिटॅमिन टेस्ट करून घ्यावी.
जर शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर सप्लीमेंट्सऐवजी ते आहारातून घेणे नेहमीच चांगले. याशिवाय आहारात संत्री, लिंबू, हंगामी अशा फळांचे सेवन करू शकता.
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्ही डिप्रेशनलाही बळी पडू शकता. दुसरीकडे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेकडे लक्ष न दिल्यास तुम्हाला ॲनिमियादेखील होऊ शकतो, तर जर तुमचे केस कोरडे असतील तर यामागचे कारण व्हिटॅमिन सीची कमतरता देखील असू शकते.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)