हिवाळ्यात सकाळच्या कोवळ्या किरणांमुळं फक्त शरीरालात ऊब मिळते, असं नव्हे तर संपूर्ण शरीराला आवश्यक असणारी व्हिटॅमीन डीची कमी पूर्ण होते. व्हिटॅमीन डीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास शरीराला मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते. तसेच शरीराच्या अन्य अवयवांना आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते. व्हिटॅमीन डी हाडं, मांसपेशी आणि दातांना स्वस्थ आणि मजबूत ठेवण्यास उपयोग आहे. काही लोक सकाळीची कोवळी ऊन शरीरावर घेऊ शकत नाहीत. त्यामुळं त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होतो.
रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास कोरोनाचा धोका दुप्पट होतो. यामुळं नागरिकांना सल्ला दिला जातो की, रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी काही टिप्स फॉलो करा. व्हिटॅमीन डीच्या कमतरतेमुळं रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित आजाराच्या विळख्यात येऊ शकता. माहिती करून घेऊयात या आजारांविषयी…
याच्या लक्षणांकडं बघीतलं तर, प्रभावित व्यक्ती तणावात राहतो. गुडगे दुखतात, थकवा येतो. जखमेवरील घाव भरण्यास वेळ लागतो. एवढंच नाही, तर त्यांचा मूळ नेहमी खराब असतो. अशी लक्षणं दिसल्यास लगेच डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार करावेत.
तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमीन डीच्या कमरतेमुळं सर्दी होते. सर्दी ही ऋतू बदलताना दिसून येते. हा आजार साधा दिसत असला, तरी कोरोना काळात याकडं संशयानं पाहिलं पाहिजे.
व्हिटॅमीन डीच्या कमतरतेमुळं बॅक्टेरीयल व्हायरसचा संसर्ग होतो. आपल्या रोगप्रतिकार शक्तीला व्हायरल आणि बॅक्टेरीयल संसर्गाशी लढाव लागतं. अशात व्हिटॅमीन डीची कमतरता असेल, तर व्हायरल संसर्गासमोर रोगप्रतिकार शक्ती कमजोर पडते.
व्हिटॅमीन डीची कमतरता झाल्यास रोगप्रतिकार शक्ती कमी पडते. यामुळं आजारांचा सामना करावा लागतो. व्हिटॅमीन डीची कमतरता कित्तेक पद्धतीनं पूर्ण केली जाऊ शकते. त्यामध्ये सर्वात चांगला उपाय म्हणजे कोवळ्या उन्हात बसणे. शिवाय तुम्ही फळ, भाजीपाल्यांचं सेवन भरपूर प्रमाणात केलं पाहिजे की, ज्यामध्ये व्हिटॅमीन डी भरपूर असते.
उच्च रक्तदाबही रोगप्रतिकार शक्तीला प्रभावित करतो. अहवालानुसार, व्हिटॅमीन डीच्या कमीमुळं उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. ज्या लोकांमध्ये व्हिटॅमीन डीची कमतरता राहते, त्यांना टाईप दोनचा मधुमेह होऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती खूपच कमजोर असल्याचं मानलं जातं.