जगभरात अनेक व्यक्ती विविध फोबियांशी लढत असतात. काहींना उंचीचा, तर काहींना बंद जागेचा, उडण्याचा ( विमान प्रवास) फोबिया (Phobia) असतो. तर काही लोकांना सुयांची, कोळी किंवा कुत्रा यांसारख्या प्राण्यांची भीती वाटत असते. मात्र फोबियाग्रस्त व्यक्तींसाठी उपयोगी ठरेल अशी माहिती समोर आली आहे. व्हर्च्युअल रिॲलिटी (VR – Virtual reality) थेरपीमुळे एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती म्हणजेच फोबिया कमी होऊ शकतो, अशी माहिती नव्या संशोधनातून समोर आली आहे. जगात दर 12 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा फोबिया असतो. ‘ऑस्ट्रेलियन आणि न्युझीलंड जर्नल ऑफ सायकिॲट्री’मध्ये याविषयीचे संशोधन पब्लिश झाले आहे. सुमारे सहा आठवड्यांच्या (व्हर्च्युअल रिॲलिटी थेरपी) ट्रीटमेंटनंतर, सहभागी व्यक्तींच्या फोबियाच्या लक्षणांमध्ये (Symptoms) 75 टक्के घट झाल्याचे दिसून आले, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
या संशोधनासाठी ज्यांना उडणे ( विमान प्रवास), उंच जागा, सुया, कोळी आणि कुत्र्यांची भीती वाटते, अशा 18 ते 64 वयोगटातील 129 व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. मे 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधी दरम्यान ही ट्रायल झाली. त्यानंतर 12 आठवडे त्यांचा फॉलो-अप घेण्यात आला. यामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी, फोबिया आणि ॲंक्झायटीशी झगडणाऱ्या व्यक्तींवर उपचारासाठी वापरण्यात येणारे एक स्मार्टफोन ॲप ( fully self-guided smartphone app) डाऊनलोड केले होते. यामध्ये ( सहभागी व्यक्तींना) दर आठवड्याला काही प्रश्न मेल करण्यात येत होते व त्यांनी दिलेल्या उत्तरांवरून प्रगती नोंदवण्यात आली. ज्या व्यक्तींना (फोबियाचा) जास्त त्रास होऊ शकतो, अशा लोकांच्या मदतीसाठी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मदतीसाठी तत्पर ठेवण्यात आले होते.
‘व्हर्च्युअल रिॲलिटी (VR)360-डिग्री व्हिडीओ एक्सपोजर थेरेपी आणि कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरेपी (CBT)’ यांचा संयुक्त प्रोग्रॅम असलेले ॲप आणि हेडसेट्स यांचा वापर सहभागी व्यक्तींनी केला होता. ज्यांना उडणे ( विमान प्रवास), उंच जागा, सुया, कोळी आणि कुत्र्यांची भीती, हे पाचही फोबिया होते, त्यांच्यामध्ये या प्रोग्रॅमनंतर लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले. या प्रोग्रॅममध्ये कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरेपीमधील (CBT components) सायकोएज्युकेशन, रिलॅक्सेशन, माईंडफुलनेस, कॉग्निटिव्ह टेक्निक्स, रिलॅप्स प्रिव्हेन्शन मॉडेल अशा अनेक घटकांचा समावेश होता.