कमरेच्या चरबीमुळे मधुमेह, हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका; वाचा बेली फॅट कमी करण्याचे पाच सोपे उपाय!

| Updated on: Aug 29, 2021 | 7:41 AM

बेली फॅट म्हणजे कमरेभोवती चरबी वाढणे आरोग्यासाठी चांगलं नाही, असा इशारा हॉवर्ड मेडिकल हेल्थने दिला आहे. वैद्यकीय भाषेत या अनहेल्दी फॅटला विसरल फॅटही म्हटलं जातं. (Waist fat increases the risk of diabetes, heart disease and cancer)

कमरेच्या चरबीमुळे मधुमेह, हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका; वाचा बेली फॅट कमी करण्याचे पाच सोपे उपाय!
पोटावरची चरबी
Follow us on

नवी दिल्ली: बेली फॅट म्हणजे कमरेभोवती चरबी वाढणे आरोग्यासाठी चांगलं नाही, असा इशारा हॉवर्ड मेडिकल हेल्थने दिला आहे. वैद्यकीय भाषेत या अनहेल्दी फॅटला विसरल फॅटही म्हटलं जातं. कमरेभोवती अधिक चरबी असल्यास टाईप-2 मधुमेह, हृदयरोगच नव्हे तर कँसरचा धोकाही उद्भवू शकतो, असं या मेडिकल हेल्थने म्हटलं आहे. (Waist fat increases the risk of diabetes, heart disease and cancer)

बेली फॅट कमी करण्याचे काही साधे उपाय

1) कॅलरी मॅनेजमेंट: 500 कॅलरी अधिक खर्च करा

वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही. फक्त जेवढे खाल त्या तुलनेत 500 कॅलरीज अधिक खर्च करा. त्याला हेल्दी कॅलरी डेफिसिट म्हणतात.

2) चालण्याचा नियम: आठवड्यातून 3 दिवस 50-70 मिनिटे चाला

त्यामुळे बेली फॅट बऱ्याचप्रमाणात कमी होतात. हॉवर्ड इन्स्टिट्यूच्या मते, यामुळे केवळ त्वचेच्या खालचाच नव्हे तर अॅब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये असलेली चरबीही कमी होते.

3) जेवण्याचा फॉर्मूला: 30 टक्के कॅलरीज प्रोटीनमधून घ्या

मेटाबॉलिज्ममध्ये दरदिवशी 80 ते 100 कॅलरींची वाढ होते. सामान्य कसरत करणाऱ्यांनी 50 ग्रॅम म्हणजे जेवणासोबत मुठभर प्रोटीन घ्यावे. दही, डाळ, ओट्स, ब्रोकली हे प्रोटीन मिळण्याचे चांगले स्त्रोत आहेत.

4) भरपूर झोप: 7 तासांची झोप आवश्यक

पुरेशी झोप न घेणारे किंवा अनिद्रेने त्रस्त असलेल्या लोकांचं वजन वाढण्याची शक्यता असते. पूर्ण झोप न घेतल्याने त्याचा भूक लागण्यावर परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील ग्लूकोजच्या स्तरावर परिणाम होतो.

5) व्यायामाची आवश्यकता: 15 मिनट ‘हिट’ एक्सरसाइज करा

हिट म्हणजे हाय इंटेंसिटी इंटरव्हल ट्रेनिंग. स्पोर्ट्स न्यूट्रीशनिस्ट डेव्हिड स्टेस यांच्या मतानुसार, कमरेच्या भोवतीची चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम अतिशय उपयोगी ठरतो. त्यामुळे शरीरातील इन्युनिटीही वाढते. त्यासाठी इक्विपमेंटची गरज पडत नाही. रोज अर्धा तासभर हाय इंटेसिटी वर्कआऊट केल्याने शरीर फिट राहतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक एक्सरसाईज 40 सेकंद करायची आहे. 20 सेकंद विश्रांती घेतल्यानंतर हा व्यायाम करायचा आहे.

‘हिट’ वर्कआउटचा चार्ट

नवख्यांसाठी: वार्मअप विथ डायनॅमिक स्ट्रेचिंग

3 मिनटं कॉर्डियोसाठी: वॉक, जॉग, स्प्रिंट म्हणजे वेगाने धावणे
3 मिनटं स्ट्रेंथसाठी: बॉडी बॅलन्स, स्कॉट्स (उठबश्या), पुशअप
3 मिनटं कोअरसाठी: फोरआर्म प्लँक, शोल्डर प्लँक आणि व्ही प्लँक

गृहिणींसाठी

3 मिनटं कॉर्डियोसाठी: जंपिंग जॅक, हाय नी, फ्लोअर स्टेपिंग
3 मिनटं स्ट्रेंथसाठी: फ्लोअर क्रंचेस, बायसिकल क्रंचेस, रिव्हर्स क्रंचेस
3 मिनटं कोअरसाठी : फोरआर्म प्लँक, शोल्डर प्लँक आणि व्ही प्लँक

सिटिंग जॉब करणाऱ्यांसाठी

3 मिनटं कॉर्डियोसाठी: सीटेड स्कॉट जंप, प्लँक जॅक, माऊंटेन क्लायंबर आणि हाय नी
3 मिनटं स्ट्रेंथसाठी: स्टेप अप ऑन स्टेपर, सुपरमॅन प्लँक रो, ट्रक क्रंचेस
3 मिनटं कोअरसाठी : सुपर मॅन प्लँक आणि रिव्हर्स प्लँक

उभ्याने ड्यूटी करणाऱ्यांसाठी

3 मिनटं कॉर्डियोसाठी: स्कॉट जंप, स्टेप अप ऑन स्टेपर, हाय नी
3 मिनटं स्ट्रेंथसाठी: बॅलन्स ऑन स्टेपर (30-30 सेकंद), डायनामिक लंग्स, वॉल सिट
3 मिनटं कोअसाठी: फोरआर्म प्लँक, शेल्डर प्लँक आणि स्विच प्लँक (Waist fat increases the risk of diabetes, heart disease and cancer)

संबंधित बातम्या:

Amazing Benefits Of Walking : रात्री जेवणानंतर चालणे आरोग्यासाठी लाभ, जाणून घ्या काय काय आहेत फायदे

हाडे मजबूत करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

Health Tips : या 5 औषधी वनस्पती मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास करू शकतात मदत

(Waist fat increases the risk of diabetes, heart disease and cancer)