मुंबई : आपल्यापैकी अनेकजण जेवण झाल्यानंतर थोडा वेळ चालतात. कारण असे म्हटंले जाते की, जेवणानंतर थोडावेळ चालण्याने अन्नाचे सहज पचन करण्यास मदत होते. मात्र, अनेकांच्या मनात नेहमीच प्रश्न पडतो की, खरोखरच जेवण झाल्यानंतर चालल्याने जलद पचन आणि चांगले चयापचय होते का? याबाबत संशोधनात काय समोर आले आहे ते जाणून घेऊयात….
नेमके कोणते फायदे होतात
-जेवल्यानंतर आपले शरीर काम करण्यास सुरवात करते. पोषक तत्वे शोषून घेते. अन्नाच्या विघटन किंवा पचनाचा एक महत्त्वाचा भाग लहान आतड्यात होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की जेवणानंतर चालणे पोटातून आणि लहान आतड्यात अन्न जलद मार्गाने जाण्यास मदत होते.
-तुमच्या पोटातून लहान आतड्यात जेवढ्या जलद अन्नाची हालचाल होते. तितकीच तुम्हाला गॅस आणि ऍसिड रिफ्लक्स सारख्या सामान्य तक्रारी होण्याची शक्यता कमी होते. जेवणानंतर 30 मिनिटे चालणे, नियमित व्यायामासह आतड्यांचे कार्य सुधारू शकते आणि बद्धकोष्ठतेची शक्यता कमी करू शकते.
-अभ्यासात असे म्हटले आहे की, पोस्टप्रान्डियल चालणे केवळ पाचक लक्षणे कमी करत नाही तर टाइप-2 मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर आहे. न्यूझीलंडमधील ओटागो विद्यापीठातील संशोधन असे सूचित करते की टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी, जेवणानंतर चालणे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी चांगले असते.
-शरीर अन्नाचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करते. जो शरीरासाठी ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. जेवण केल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. या स्पाइकचा सामना करण्यासाठी शरीर इन्सुलिन तयार करते. जे पेशींमध्ये ग्लुकोज हलविण्यास मदत करते. मधुमेही व्यक्तींसाठी इंसुलिनची क्रिया बिघडते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्याची प्रक्रिया थांबते.
-जेवणानंतर खूप धावल्याने अॅसिड रिफ्लक्स होऊ शकते आणि तुमचे पोट खराब होऊ शकते. आपल्या लंच किंवा डिनरनंतर 30-45 मिनिटे चालले पाहिजे. तुमच्या जेवणानंतर हलक्या ते मध्यम वेगाने चालण्याची देखील शिफारस केली जाते. कारण अधिक तीव्र वर्कआउट्समुळे अधिक रक्त कार्यरत स्नायूंकडे आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टपासून दूर जाऊ शकते. यामुळे तुमची पचनक्रिया मंदावते आणि अपचन होऊ शकते.
संबंधित बातम्या :
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Walking after a meal is good for your health)