नवी दिल्ली: पायी चालणं (walking) हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं, हे आपल्याला माहीत आहेच. मात्र आपण किती पावलं चाललो, याचा हिशोब ठेवणं (keeping the count) हेही खूप महत्वाचे असते. अनेक व्यक्ती एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त पावलं चालतात तर काही जण खूप हळूहळू चालत (slow walking) असतात. तर आज आपण जाणून घेऊया की पटापट चालणं चांगलं असतं की हळूहळू चालणं फायदेशीर ठरतं. तुमच्या प्रत्येक पावलाचं गणित जाणून घेऊया..
पायी चालण्याने हृदयविकाराचा धोका 25 टक्के कमी होतो. तसेच चालण्यामुळे अकस्मात मृत्यूचा धोका 35 टक्क्यांपर्यंत कमी होतो. चालण्याच्या व्यायामामुळे विसरणे किंवा विस्मृतीच्या आजाराचा धोका 50 टक्क्यांपर्यंत कमी होतो.
अनेक अहवालांमधून ही माहिती समोर आली आहे की जलद चालणे, हे जास्त फायदेशीर ठरते. हळूहळू 10 हजार पावले चालण्यापेक्षा पटापट किंवा जलद 3000 पावले चालणे हे फायदेशीर ठरते. एकदम चालण्यापेक्षा संपूर्ण दिवस पटापट पाऊले टाकावीत.
एका मिनिटांत 90 पावले चालण्याचा प्रयत्न करावा. दररोज 3000 पावले चालणे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. जलद चालण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे हृदय विकाराचा धोका, कॅन्सर, विस्मृतीचा धोका कमी होतो.
जर तुम्ही हळूहळू चालत असाल तर तुमच्यासाठी 7500 पावलं पुरेशी आहेत, कारण ते 6 किलोमीटर अंतराइतके असते.