Health tips : तुमची इम्युनिटी (Immunity) कमी झाल्यास तुम्हाला सर्दी खोकल्यासारखे आजार सहज होतात. तसेच इतर आजारांचा देखील धोका असतो. कोरोनाच्या (Corona) काळात तर इम्युनिटी वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. आज अनेकजण विविध माध्यमातून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतात. चुकीच्या खाण्याच्या सवई, फास्ट फुडचे (Fast food) अधिक प्रमाणात सेवन, व्यायाम न करणे, योग्य प्रमाणात आराम न करणे अशा विविध कारणामुळे तुमची इम्युनिटी कमी होऊ शकते. इम्युनिटी कमी झाल्यास तुम्हाला विविध आजारांची लागण लगेच होते. त्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी सकस आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. आहारामध्ये हिरव्या पालेभाजांचा अधिकाधिक समावेश करावा, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. आज आपण अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.
दही हे सर्वोत्तम प्रोबायोटिक पदार्थांपैकी एक आहे. यामध्ये असलेले सूक्ष्मजीव आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. दही अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. इतकेच नाही तर दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-2, बी-12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात तुम्ही दुपारी दह्याचे सेवन करू शकता. रात्री शक्यतो दह्याचे सेवन टाळावे.
लसणाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. भारतीय घरांमध्ये स्वयंपाकासाठी याचा वापर केला जातो. लसणाच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. लसण विविध प्रकारचे कर्करोग टाळण्यास मदत करतो. लसणामध्ये अॅलिन नावाचा घटक असतो, जो तिखट चव आणि सुगंध देतो. हा घटक सर्दी आणि फ्लूशी लढण्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे.
गाजर ही एक अशी वनस्पती आहे की, जिच्या सेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती दुप्पट वाढते. वास्तविक, गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे काही काळानंतर व्हिटॅमिन ए मध्ये बदलते. व्हिटॅमिन ए मध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करतात.
शेंगदाण्यात अँटिऑक्सिडंट आणि संसर्गाशी लढणारे व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः भिजवलेले शेंगदाणे खाणे अधिक फायदेशीर असते. एवढेच नाही तर शेंगदाण्यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळते, यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
महिन्याच्या ‘त्या’ दिवसांमध्ये वजन वाढल्यासारखे वाटते? समोर आले हे आश्चर्यकारक कारण
मुलांना हेल्दी, गुबगुबीत आणि उंच बनवायचं असेल तर मुलांना ब्रोकोली राइस द्यायलाच हवा!