Heart Attack यायच्या 4 आठवडे आधी मिळेल Warning Sign, या 10 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!

| Updated on: Jul 13, 2023 | 9:18 AM

हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही. त्याआधी आपले हृदय अनेक प्रकारच्या समस्यांमधून जात असते, जेव्हा समस्या नियंत्रणाबाहेर जातात तेव्हा मात्र याचं रूपांतर ते अटॅक मध्ये होतं. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर अनेक प्रकारचे हिंट देते.

Heart Attack यायच्या 4 आठवडे आधी मिळेल Warning Sign, या 10 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
warning signs before heart attack
Follow us on

मुंबई: हृदयविकाराचा झटका हे जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. भारतातही अनेक रुग्ण आहेत. आपल्या देशात तेलकट पदार्थ खाण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे, ज्यामुळे रक्तात बॅड कोलेस्टेरॉल जमा होते. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो तेव्हा ते रक्त रक्तवाहिनीला हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. यामुळे रक्तदाब वाढतो आणि मग हृदयविकाराचा झटका आणि ट्रिपल व्हेसल डिसीजचा धोका वाढतो. अशा वेळी ते कसे टाळावे.

हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही. त्याआधी आपले हृदय अनेक प्रकारच्या समस्यांमधून जात असते, जेव्हा समस्या नियंत्रणाबाहेर जातात तेव्हा मात्र याचं रूपांतर ते अटॅक मध्ये होतं. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर अनेक प्रकारचे हिंट देते. नुकतंच महिलांवर एक संशोधन करण्यात आले. या संशोधनात काय म्हटलंय बघुयात…

संशोधन काय म्हणते?

सर्क्युलेशन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, हृदयविकाराचा झटका येण्याच्या सुमारे 1 महिन्यापूर्वी त्याचे लक्षण दिसू लागते. 500 हून अधिक महिलांवर हा अभ्यास करण्यात आला आणि त्यांना हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवण्यात आले. सुमारे 95 टक्के महिलांनी सांगितले की, महिनाभरापूर्वी त्यांच्या शरीरात काही लक्षणे दिसू लागली होती. 71 टक्के लोकांना थकवा जाणवत होता, तर 48 टक्के लोकांना झोपेशी संबंधित समस्या होत्या. याशिवाय छातीत दाब येणे, छातीत दुखणे अशा समस्या होत्या.

आपल्या शरीरात खालीलपैकी कोणतीही समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि आवश्यक चाचण्या करून घ्या, कारण हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.

  • हार्ट बीट फास्ट होणे
  • भूक न लागणे
  • हात-पायाला मुंग्या येणे
  • आंबट ढेकर
  • रात्री श्वास घेण्यास त्रास होणे
  • हातामध्ये अशक्तपणा किंवा जडपणा
  • थकवा
  • झोपेची कमतरता
  • डिप्रेशन
  • कमकुवत दृष्टी

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)