मुंबई : स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी अनेक महिलांना हाय हील्स सॅंडल वापरतात. पूर्वीच्या काळात फक्त मॉडेल आणि अभिनेत्री हाय हील्स घालायच्या. मात्र, आजच्या काळात जवळपास सर्वच महिला हाय हील्स वापरतात. उंच आणि सुंदर दिसण्यासाठी महिलांना पार्टी, शॉपिंग आणि ऑफिसमध्ये हाय हील्स घालणे आवडते.
तासन्तास हाय हील्स घातल्याने आपल्या पायात वेदना होतात. विशेषत: जर तुम्ही अधूनमधून हाय हील्स घालत असाल तर जास्त त्रास होतो. पायांवरील सतत दाबामुळे समस्या वाढतात. कदाचित तुम्हाला माहित नसेल की वाढत्या समस्यांमुळे शस्त्रक्रिया करावी लागते. जर तुम्हाला तासन्तास हाय हील्स घालण्याची सवय असेल तर आधी त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.
1. पाय दुखणे
तासन्तास हाय हील्स घातल्याने कंबर आणि पाठदुखीच्या तक्रारी वाढतात. यामुळे स्नायूंमध्ये तणावाची भावना तयार होते. याशिवाय गुडघे आणि कूल्ह्यांमध्ये दाब पडल्याने गर्भाशयाचा धोका वाढतो.
2. गुडघेदुखी
हाय हील्स घालण्यामुळे पाठीच्या कण्यावरही दबाव येतो. ज्यामुळे गुडघ्यांवर परिणाम होतो. सतत हाय हील्स घातल्याने गुडघेदुखी होऊ शकते.
3. फ्रॅक्चरचा धोका
तज्ञांच्या मते, नेहमी हाय हील्स घालल्यामुळे पायांच्या हाडांवर, कंबरेच्या हाडावर, कूल्ह्यांवर परिणाम होतो. यासह, आपली मुद्रा देखील खराब होते. हाय हील्स घातल्याने हाडांमध्ये फ्रॅक्चर होण्याची शक्यताही वाढते.
4. आर्च स्ट्रेन
हाय हील्स घालण्यामुळे पायावर परिणाम होतो. ज्यामुळे पाय सामान्यच्या तुलनेत किंचित वाकलेले होतात. बराच वेळ हाय हील्स घातल्याने पायात खूप वेदना होतात. पायात स्ट्रेचिंग जाणवते आणि पायांच्या बोटामध्येही वेदना होते.
5. पॉश्चर खराब
सारख हाय हील्स घातल्याने तुमच्या पॉश्चरचे नुकसान होऊ शकते. कधीकधी हाय हील्स घालणे चांगले असते. हाय हील्स घालताना विशेष काळजी घ्या. स्नायूंमध्ये तणाव राहणार नाही आणि पायांना त्रास होणार नाही. याकडे देखील लक्ष द्या. हाय हील्स घातल्यावर पायात जास्त वेदना होत असतील तर कोमट पाण्यात मीठ टाकून पाय ठेवा. असे केल्याने तुमच्या पायांनाही आराम मिळेल आणि कमी वेदना होतात.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Wearing high heels is dangerous for the body)