मुंबई : प्रत्येकाला आपण सडपातळ, यंग आणि हँडसम दिसावं असं वाटतं. आजच्या पिढीमध्ये तर सडपातळ दिसण्याचं जणू फॅडच आलं आहे. त्यामुळे वजन कमी (Weight loss) करण्यासाठी प्रत्येकजण नाना क्लृप्त्या करत असतो. कोणी जीममध्ये घाम गाळतो, कोणी डायट (Diet) करतो तर कोणी सायकलिंग करतात. काही लोक तर दिवसातून एकच वेळ जेवतात. अनेक पथ्य पाळतात. तर काही लोक तर थेट डॉक्टरकडे जाऊन औषधे (medicine) घेऊन बारीक होण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, कधी कधी मनाचे प्रयोग अंगलट येऊ शकतात. काही गोष्टी योग्य सल्ल्यानेच करायला हव्यात. त्यामुळे डोक्याला ताप राहत नाही. तुम्ही जर सडपातळ होण्याचा किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आणंखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी सकाळच्यावेळी काही गोष्टी करणं आणि न करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही त्या गोष्टी करत नाहीत ना? काय करावे आणि काय करू नये यासाठी खालील गोष्टी जरूर वाचा.
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात. यातील काही ट्रिक्सचा फायदा होतो. तर काहींमुळे नुकसान होतं. त्यामुळे काही गोष्टींचं बंधन पाळणं आवश्यक आहे. तुम्हीही काही चुका तर करत नाही ना? करत असाल तर आजपासून त्या टाळाच. नाही तर मोठं नुकसान होईल.
अधिक कडक किंवा गरम पाणी प्यायलास चरबी जळते असा लोकांमध्ये गैरसमज पसरला आहे. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, अधिक गरम पाणी प्यायल्यास शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाणी प्यायला पाहिजे, पण ते उकळलेलं नसावं. तर कोमट असावं.
वजन कमी करणाऱ्या काही लोकांना वाटतं की, व्यायाम करत असताना घाम जात असेल तर अनेक तास पाणी पिऊ नये. त्यांच्या मते असं केल्याने शरीरातील चरबी जळते. मात्र, एक्सपर्ट्सच्या मते, व्यायाम करताना मध्येमध्ये पाणी प्यायलं पाहिजे.
रोज वर्क आऊट आणि डाएट केल्यानेही वजन कमी केलं जाऊ शकतं. मात्र, यावेळी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. यात केवळ प्रोटिन असणं पुरेसं नाहीये. तर त्यासोबत फळेही असावेत. त्यात कार्ब्सचं प्रमाणही पुरेसं असलं पाहिजे. मात्र, बहुतेक लोक प्रोटीनवरच अवलंबून असतात.
वजन कमी करण्यासाठी हलका आहार घेतला पाहिजे. मात्र काही लोक नाश्ता करण्याचं रुटीनही फॉलो करतात. हेल्थ एक्सपर्टच्या मते, चुकूनही नाश्ता करू नये. तुम्ही वर्कआऊट करून नाश्ता केला तर तुमचं वजन कमी होईल. पण तुमच्या शरीराला अनेक आजार लागतील.