सध्याच्या काळात अनेकांना आपले वजन (Weight) नियंत्रीत असावे असे वाटत असते. खासकरुन महिला वजनाच्या बाबतीत अत्यंत जागृत असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले जात असतात. अगदी जीमपासून ते रोजच्या आहारात कुठल्या गोष्टींचा समावेश असावा इतपर्यंत सर्व काही केले जाते. परंतु वजन कमी करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातीलच काही वस्तू आहेत, ज्या आपल्याला मदत करतील. मूग डाळ (moong dal) किंवा हिरव्या मसूरमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि तांबे यांसारखी खनिजे असतात. त्यात फोलेट, फायबर आणि व्हिटॅमिन बी 6 भरपूर प्रमाणात असण्यासोबतच उच्च दर्जाचे प्रोटीन (protein) देखील असते. यामध्ये व्हिटॅमिन बी असते. अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असताना डॉक्टर अनेकदा या डाळीचे सेवन करण्याचा सल्ला देतात. मुग डाळ शरीरासाठी ऊर्जा निर्माण करते. फॉलिक अॅसिड आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या आहारात मूग डाळ समाविष्ट करणे खूप फायदेशीर आहे.
या डाळीचे सेवन आठवड्यातून एकदा तरी करावे. त्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. हे स्नायूंच्या आकुंचनाला प्रतिबंध घालत असल्याने त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी मोड आलेल्या मूग डाळीचा नेहमी आहारात समावेश करावा.
‘कोलीसिस्टोकाइनिन’ या हार्मोनचे कार्य सुधारण्यासाठी मूग डाळ खूप चांगली आहे. हा हार्मोन आपल्याला पोट भरल्याचे समजते. या हार्मोनमुळे पचनक्रियादेखील सुधारत असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दुपारच्या जेवणात भाताबरोबर किंवा पोळीसोबत मुगाच्या दाळीचे सेवन चांगले मानले जाते. सकाळी मोड आलेल्या मुगाची उसळ नाश्त्यासाठी उत्तम असते.
मूग डाळ कमी ग्लायसेमिक इंडेक्ससाठी ओळखली जाते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. मोड आलेल्या हिरव्या मूगाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे, यातून रोगप्रतिकारशक्तीदेखील वाढत असते.
मूग डाळ आतड्यात ब्युटीरेट नावाचे फॅटी अँसिड तयार करण्यास मदत करते. हे आपल्या आतड्यांसाठी खूप चांगले आहे. यामध्ये भरपूर फायबर असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.
मुगाच्या डाळीचे सेवन रक्ताभिसरणासाठी खूप चांगले आहे. यामध्ये लोह असते जे लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते. हे अॅनिमियापासून बचाव करण्यास देखील मदत करते.
मूग डाळीमध्ये विशेष गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकारक पेशी मजबूत ठेवतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे सर्दी आणि फ्लूची समस्या दूर राहण्यास मदत होते, त्यामुळे नेहमी आपल्या आहारात मोड आलेल्या मुगाच्या डाळीचा समावेश नक्की करावा.
Health : 12 ही महिने सर्दी आणि खोकल्यामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करा आणि निरोगी राहा!
मासिक पाळीच्या काळात दही खाताय?, जाणून घ्या फायद्याचे आहे की नुकसानदायक!