मुंबई : वजनाचा काटा कमी करणे (Weight loss tips) हे खूप मोठे आव्हान आहे. वजन वाढण्यामागे खूप गोष्टी असतात. वजन वाढल्याने आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वजन नियंत्रित असावे. वजनाचा काटा नियंत्रित करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या आहाराकडे (Proper diet) लक्ष द्या. विशेषतः आपल्या आहारात कोणकोणत्या आवश्यक घटकांचा समावेश असावा हे समजून घ्या. वजन वाढणे ही आजकालची अतिशय सर्वसामान्य समस्या आहे. पण वजन वाढल्याने त्या व्यक्तीला इतर आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे स्लीमट्रीम दिसावे म्हणून वेगवेगळे पर्याय निवडले जातात. पण वजनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर अगोदर खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण हवे हे समजून घ्या. खाण्यापिण्याच्या आपल्या चुकीच्या सवयी (Wrong habits) शरीरात अतिरिक्त चरबी अर्थात फँट जमवतो. त्यामुळे बाहेरचे जकंफूड, फास्टफूड, तेलकट पदार्थ कमी करून लो कँलरीज पदार्थांचा आहारात समावेश करा. हे पदार्थ तुम्हाला वजन घटवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
अंड्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात. शिवाय अंडी खाल्याने लवकर भूक लागत नाही. कारण खूप वेळ पोट भरल्यासारखे वाटते. अशावेळी जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी जरूर खा. अंडा शरीरासाठी उपयुक्त असतो आणि यामुळे तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त खाणार नाही. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अंडे फायद्याचे ठरतील.
ओटमीलमध्ये तंतूमय घटक म्हणजे फायबर असतात. याशिवाय ही कार्ब्सचा मोठा स्रोत आहे. ओटमील सुद्धा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. नाश्त्यामध्ये ओटमील खाल तर खूप वेळ भूक लागणार नाही. याशिवाय ओटमील शरीराची ऊर्जा कायम ठेवतो.
होय बिया सुद्धा वजन नियंत्रणासाठी शिसम, चिया, फ्लैक्स, भोपळ्याच्या बिया मदत करतात. शरीराची कमजोरी दूर करून एनर्जी वाढवण्यासाठी या बिया उपयुक्त आहेत.
आपल्या आहारात गहू, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, रागी आणि ब्राउन राइसचा समावेश करा. हे घटक फायबरयुक्त आणि पौष्टिक असतात. यामुळे पोट भरून राहत आणि वजन नियंत्रणात राहते.
इतर बातम्या :