Weight Loss | कोण म्हणतं गोड पदार्थ खाऊन वजन कमी करता येत नाही? ‘हे’ करून बघा

| Updated on: Aug 11, 2023 | 3:09 PM

गोड पदार्थ खाणं आरोग्यासाठी चांगलं नसतं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पण मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास मध हा एक चांगला पर्याय आहे. यात व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन सी, नियासिन, अमिनो अॅसिड, कार्बोहायड्रेट आणि राइबोफ्लेविन असते, ज्याच्या माध्यमातून वजन कमी केले जाऊ शकते.

Weight Loss | कोण म्हणतं गोड पदार्थ खाऊन वजन कमी करता येत नाही? हे करून बघा
weight loss with the help of honey
Follow us on

मुंबई: लठ्ठपणामुळे अनेक जण त्रस्त असतात, हा आजार नाही, पण अनेक आजारांचे मूळ नक्कीच आहे. यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेह यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. वजन कमी करण्यासाठी कसरत आणि कडक आहाराचा आधार घ्यावा लागतो. आहारतज्ञ सांगतात की जर एखादी गोष्ट मधात मिसळून खाल्ली तर वजन झपाट्याने कमी होते आणि तुम्ही स्लिम होऊ शकता.

मधात आढळणारे पोषक घटक

गोड पदार्थ खाणं आरोग्यासाठी चांगलं नसतं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पण मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास मध हा एक चांगला पर्याय आहे. यात व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन सी, नियासिन, अमिनो अॅसिड, कार्बोहायड्रेट आणि राइबोफ्लेविन असते, ज्याच्या माध्यमातून वजन कमी केले जाऊ शकते.

मधात या गोष्टी मिसळल्यास वजन कमी होईल

1. गरम पाणी आणि मध

गरम पाण्यात मध मिसळून एकत्र पिऊ शकता. यासाठी सकाळी उठून गॅसवर एक ग्लास पाणी उकळून त्यात मध मिसळावा. याचे सेवन केल्याने पोट आणि कमरेची चरबी झपाट्याने कमी होते आणि भूकही जास्त जाणवत नाही, ज्यामुळे तुमचं जास्त खाणं होत नाही.

2. लिंबाचा रस आणि मध

वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण अतिशय प्रभावी मानले जाते, ही शतकानुशतके वापरली जाणारी घरगुती रेसिपी आहे. यासाठी तुम्ही रोज सकाळी एक ग्लास पाणी गरम करून त्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे चयापचय वाढते आणि शरीरातील चरबी बर्न होते. तसेच शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात.

3. दूध आणि मध

दूध हे स्वत:च एक परिपूर्ण अन्न असून त्यात मध मिसळल्यास अनेक समस्या दूर होतात. यासाठी एक ग्लास कोमट दुधात एक चमचा मध घालून हळूहळू प्या. असे केल्याने चयापचय वाढते आणि बराच वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे जाते.

4. दालचिनी आणि मध

दालचिनीचा वापर पाककृतींची चव वाढवण्यासाठी केला जातो, मधासोबत सेवन केल्यास वजन कमी करणे सोपे जाते. एक ग्लास पाण्यात दालचिनीचा तुकडा उकळून पाणी फिल्टर करा, त्यात मध घालून प्या.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)