Health : पावसाळ्यात वाढू शकतो डेंग्यूचा धोका, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

| Updated on: Jul 29, 2022 | 2:07 PM

डासांमुळे डेंग्यूचा प्रसार होतो. डेंग्यूचा संसर्ग झाल्यामुळे खूप ताप येतो आणि अंगदुखीचा त्रास होतो. डेंग्यूवर त्वरित उपचार न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.

Health : पावसाळ्यात वाढू शकतो डेंग्यूचा धोका, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
सांकेतिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : पावसाळा सुरू होताच विविध संसर्ग आणि आजार डोकं वर काडू लागतात. जागोजागी साठलेले पाणी, कचरा, दूषित पाणी, हवा यामुळे आजारांचा धोका वाढतो. पावसाळ्याच्या ऋतूत डेंग्यूचा (Dengue) धोकाही वाढतो. हा आजार डासांमुळे पसरतो. त्यामुळे विशेष काळजी घेतली पाहिजे. डेंग्यूचा त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे ( Go to doctor) जावे, अन्यथा आजार वाढून गंभीर परिणाम सहन करावे लागू शकतात. डेंग्यू हा एक संसर्गजन्य आजार असून, डास चावल्यामुळे तो होऊ शकतो. पावसाळ्यात विशेष काळजी घेतल्यास डेंग्यूच्या प्रकोपासून वाचू (Prvention) शकतो. ताप, अंगदुखी चा त्रास सतत जाणवत राहिल्यास डेंग्यूचा संसर्ग झालेला असू शकतो. अशा परिस्थितीत, जराही वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार सुरू करावेत. पूर्ण आराम करून औषधांचा कोर्स पूर्ण करावा. उपचार मध्यातच सोडल्यास पुन्हा त्रास होऊ शकतो.

काय सांगतात डॉक्टर ?

एअरफोर्सचे माजी मेडिकल ऑफीसर आणि जनरल फिजीशियन डॉ. वरूण चौधरी यांच्या सांगण्यानुसार, डेंग्यू हा एक संसर्गजन्य आजार आहे. डास चावल्यामुळे हा आजार होऊ शकतो. पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यूचे रुग्ण वाढू लागतात सप्टेंबर महिना ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत डेंग्यूचा धोका अधिक असतो. डेंग्यू झाल्यास ताप येतो, रक्तपेशींचे प्रमाण कमी होते आणि शरीरातील ताकद कमी होते. या आजारावर तातडीने उपचार करणे गरजेचे असते. निष्काळजीपणा केल्या हा आजार जीवावर बेतू शकतो. त्यामुळे सतत ताप येणे, सतत अंग दुखणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवून रक्ताची तपासणी करून घ्यावी.

ही आहेत डेंग्यूची लक्षणे –

– अचानक ताप येणे, वाढणे
– तीव्र डोकेदुखी सुरू होणे
– डोळ्यांच्या खालच्या भागात दुखणे
– सांधे व मसल्स दुखणे
– खूप थकल्यासारखे वाटणे
– उलटी होणे वा सतत उलटीची भावना होणे
– त्वचेवर रॅशेस येणे
– नाक अथवा तोंडात, हिरड्यांना सूज येणे.

कसा कराल डेंग्यूबासून बचाव ?

डॉ. वरूण चौधरी यांच्या सांगण्यानुसार, डेंग्यूपासून वाचायचे असेल तर सर्वप्रथम डासांना पळवून लावा. घरात व आसपासच्या जागेत कुठेही पावसाचे गढूळ पाणी जमा होऊ देऊ नका. कूलर वापरत असल्यास त्यातील पाणी वेळोवेळी बदलावे. डासांपासून वाचण्यासाठी त्वचेला क्रीम अथवा लोशन लावावे. डासांना पळवून लावणारा स्प्रे अथवा कॉईलचा वापर करावा. रात्रीच्या वेळी मच्छरदाणी लावून झोपावे. त्याशिवाय तापाची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे, गरज पडल्यास रक्ताची तपासणी करून घ्यावी. सुरूवातीच्या स्टेजलाच डेंग्यूवर उपचार सुरू झाले तर एका आठवड्यात तुम्हाला आराम मिळू शकतो. रक्तपेशींची संख्या कमी झाल्यास पुरेसा सकस व पौष्टिक आहार घ्यावा.