कराची: पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचा एमाइलॉयडोसिस या आजाराने मृत्यू झाला आहे. मुशर्रफ या आजाराने गेल्या वर्षभरापासून त्रस्त होते. त्यांच्यावर गेल्या वर्षीच्या जून 2022पासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना त्यांना चालता बोलताही येत नव्हते. उपचारालाही त्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. या दुर्धर आजारामुळे अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
एमाइलॉयडोसिस हा एक गंभीर आणि दुर्धर आजार आहे. या आजारामुळे हृदय, यकृत, किडनी आणि शरीरातील इतर भागात अमाइलॉइड प्रोटीन तयार होतं. अमाइलॉइडोसिसचे अनेक प्रकार आहेत. काही हेरिडेट्री आहेत. दीर्घकाळ डायलिसीस केल्यानेही हा आजार होऊ शकतो. या आजारामुळे शरीरातील अनेक अवयवांवर परिणम होतो.
अमाइलॉइड साधारणपणे शरीरात तयार होत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीनमुळे हे तयार होते. अमाइलॉइड हे एक असामान्य प्रोटीन आहे. साधारणपणे बोन मेरोमध्ये ते तयार होते. ते कोणत्याही टिश्यू किंवा अवयवात जमा केले जाऊ शकते.
शरीरातील कोणत्या अवयवांवर परिणाम झाला यावर या आजाराचे लक्षण दिसून येतं. सूज, थकवा, कमजोरी, श्वास घेण्यास त्रास होणे, सुन्न वाटणे, हातापायात दुखणे आदी या आजाराची लक्षणे आहेत.
1. गुडघे आणि पायांना सूज राहणे
2. श्वसनास त्रास होणे
3. थकवा आणि कमजोरी वाटणे
4. श्वसनास त्रास होत असल्याने बेडवर सरळ झोपता न येणे
5. त्वचा बदलणे, त्वचा जाड होणे किंवा किरकोळ गोष्टीमुळेही दुखापत होणे, डोळ्याच्या चारही बाजूंनी डाग पडणे
6. हृदयाची धडधड वाढणे
अमाइलॉइडोसिस कोणत्या प्रकारचा झाला आहे, त्यावरून या आजारावर उपचार केले जातात. या आजारावर कोणत्याही प्रकारचे घरगुती उपचार उपलब्ध नाहीत. हा आजार झाल्यावर औषधे घ्यावीच लागतात. त्याशिवाय किमोथेरेपी किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांट हाच याचा पर्याय आहे.
तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी डॉक्टरांचा वारंवार सल्ला घेतला पाहिजे. अमाइलॉइडोसिसशी संबंधित लक्षणे वारंवार दिसून येत असतील तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांना दाखवा आणि उपचार सुरू करा.