लठ्ठपणा हा आजच्या काळातील एक सामान्य समस्या आहे. यामागे वाईट जीवनशैली आणि अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी अशी दोन कारणे आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना झोपण्याची, उठण्याची आणि खाण्याची ठराविक वेळ नसते. त्यामुळे वजन वाढू लागते. याशिवाय रिफाइंड कार्ब, साखर आणि चरबीयुक्त आहाराचे जास्त सेवन देखील वजन वाढण्यास कारणीभूत आहे. अशातच आज आम्ही तुम्हाला रिव्हर्स डायटिंगबद्दल सांगणार आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता, तर चला तर मग जाणून घेऊया रिव्हर्स डायटिंग म्हणजे काय आणि रिव्हर्स डायटिंग कसे फॉलो करावे.
रिव्हर्स डायटिंगमध्ये हळूहळू कॅलरीजचे प्रमाण वाढवावे लागते. आठवड्यातून २ वेळा हे डाएट करा मग बघा तुमचं वजन किती आहे, शरीरात काही बदल होतील की नाही. जर तुमचे शरीर पूर्वीसारखेच दिसत असेल तर तुम्ही आपल्या आहारात 2 ते 100 कॅलरीज वाढवाव्यात.
अशावेळी जवळपास 3 ते 5 आठवडे हा रूटीन फॉलो करा. मग वजन तेवढेच आहे की कमी होत आहे ते बघा. जर तुम्हाला वजनात काही बदल दिसला तर तुम्ही तुमच्या आहारातून वाढलेल्या कॅलरीज कमी केल्या पाहिजेत.
या डाएटचे पालन करून तुम्ही तुमच्या शरीरात मेटाबॉलिझम वाढवू शकता. जर तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो केला तर तुम्हाला जास्त वेळ उपाशी राहावं लागणार नाही किंवा तुम्हाला अशक्तपणाही जाणवत नाही. याशिवाय रिव्हर्स डायटिंगचा अवलंब केल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जेची पातळीही टिकून राहते. यासोबतच तुमची एकाग्रताही चांगली राहते.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)