वजन कमी करण्याचे सर्वात अचूक तत्त्व म्हणजे ‘कॅलरी इन विरुद्ध कॅलरीज आउट’. म्हणजेच तुम्ही किती कॅलरीज (How many calories) खात आहात आणि किती कॅलरीज बर्न करत आहात. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांना हे तत्व पाळावेच लागेल. जर तुम्ही मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा कमी खाल्ले तर तुमचे वजन कमी होते. वजन कमी करतांना सर्वात अधिक कंटाळा येत असेल तर तो व्यायाम करण्याचा.. वजन कमी करण्याची इच्छा तर असते, पण व्यायाम करावा लागेल या भितीनेच अनेकजण माघार घेतात. परंतु, जर व्यायाम न करताही (Even without exercise) तुम्हालाही तुमचे वजन कमी करता येत असेल तर असा डाएट प्लॅन प्रत्येकालाच फॉलो करायला आवडेल. वजन कमी करण्यासाठी अशाच एका आहाराचे नाव आहे फिस्ट डाएट (Fist diet). फिस्ट डाएट म्हणजे काय? हे कस काम करत? याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
फिस्ट डाएट म्हणजेच, मूठभर आहार हा एक आहार आहे. ज्यामध्ये तुम्हाला मूठभर अन्न घ्यावे लागते. या आहारात तुम्हाला तीन वेळा आणि प्रत्येक जेवणात चार मुठभर अन्न खावे लागते. तुम्ही खाल्लेल्या अन्नामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, चरबी आणि फायबर यांचा समावेश असावा. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात दररोज तीन जेवणात चमचाभर चरबी म्हणजेच तूप किंवा तेल असले पाहिजे. या आहारामुळे प्रत्येक आठवड्यात सुमारे 400-900 ग्रॅम वजन कमी होऊ शकते. फिस्ट डाएटमध्ये ठराविक प्रमाणात कॅलरीज खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता. विशेष म्हणजे हा डाएट फॉलो करतांना, व्यायाम करण्याची गरज नाही.
फिस्ट डाएटमध्ये नेहमी संतुलित आहार घेतला जातो. समजा तुम्ही या आहारात मर्यादित कॅलरीजमध्ये काहीही खाऊ शकता, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही फास्ट फूड, चॉकलेट आणि मिठाई खाण्यास सुरुवात करावी. या आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेट, फॅट आणि फायबर युक्त गोष्टी खाव्या लागतात. जेवणाचे तीन भाग करा आणि नंतरच सेवन करा. प्रोटीनसाठी मांस, मासे आणि अंडी खाऊ शकतात. भाज्या, पास्ता, तांदूळ, बटाटे, तृणधान्ये आणि ब्रेड कार्बोहायड्रेट म्हणून खाऊ शकतात. नट्स फॅट म्हणून खाऊ शकतात, पण जर तुम्हाला ड्रायफ्रुट्सची अॅलर्जी असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईल, एवोकॅडो, चीज आणि बटर खाऊ शकता.
फिस्ट डाएटमध्ये व्यायाम करणे आवश्यक नाही, परंतु तज्ज्ञ शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्याची शिफारस करतात. जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुमचे वजन हळूहळू कमी होत जाईल, पण जर तुम्ही आहारासोबतच वेट ट्रेनिंग किंवा कार्डिओ करत असाल तर झपाट्याने वजन कमी होऊ शकते आणि महिन्याभरात तीन ते चार किलो वजनही कमी होऊ शकते. जर कोणी रोज 30 मिनिटे व्यायाम करत असेल तर त्याला लवकर परिणाम मिळतात.