मुंबई: व्हाईट ब्रेड हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, विशेषत: सकाळच्या नाश्त्यात आपल्याला तो सँडविच म्हणून खायला आवडतो, किंवा टोस्ट म्हणूनही तो खाल्ला जातो. या प्रकारचे अन्न तयार होण्यास फारसा वेळ लागत नाही, त्यामुळे सकाळी ऑफिस किंवा शाळेत जाताना घाईघाईत खाणे सोपे असते, पण व्हाईट ब्रेडमुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल अनेकांना माहिती नसते.
जास्त व्हाईट ब्रेड खाण्याचे तोटे
- आहारतज्ञ व्हाईट ब्रेड विषयी सांगतात की जर आपण नियमितपणे व्हाईट ब्रेडचे सेवन करत असू तर आरोग्याचे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. पांढऱ्या ब्रेडऐवजी मल्टी ग्रेन ब्रेड खा, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
- बऱ्याच पांढऱ्या ब्रेडमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते, कारण ते ब्रेड बरेच दिवसांपासून बाजारात उपलब्ध असतात. यामुळे रक्तदाब वाढू शकतो. जे लोक व्हाईट ब्रेडचे जास्त सेवन करतात त्यांच्यासाठी हा धोका जास्त असतो.
- व्हाईट ब्रेडमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स, रिफाइंड शुगर आणि मीठ असते, ज्यामुळे आपल्या शरीराचे खूप नुकसान होते. याचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी आणि चरबी झपाट्याने वाढेल, ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढेल.
- ब्रेडमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने बीपी वाढण्याचा धोका असतो. उच्च रक्तदाब म्हणजे रक्तवाहिन्यांना रक्त हृदयाकडे पाठवताना जोर लावावा लागतो. यामुळे कोरोनरी आर्टरी डिसीज, ट्रिपल व्हेसल डिसीज आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)