जगभरात अस्थमाचे 26.2 कोटी रुग्ण आहेत.अनेक दशकांहून जुना असलेला हा आजार अमेरिकेपासून भारत आणि दक्षिण आफ्रीकेत पसरलेला आहे. या आजारावर कोणताही उपचार नाही. जसा मधुमेह कधी बरा होत नाही. अशाच प्रकारे अस्थमा हा केवळ नियंत्रणात ठेवता येऊ शकतो त्यावर उपचार नाहीत. एकदा का फुप्फुसाचा हा आजार झाला की आयुष्यभर हा आजारात पिच्छा सोडत नाही.वाढत्या वयाबरोबर हा आजार गंभीर होत असतो. अनेक गंभीर प्रकरणात हा मृत्यूचे कारण ठरु शकतो. त्यामुळे अस्थमाच्या आजाराबद्दल अधिक जाणून घ्यायला हवे…हा आजार का बरा होत नाही. याचे सुरुवातीची लक्षणे कशी ओळखावी तज्ज्ञांचे काय मत आहे.
अस्थमा हा आजार लहान मुलांमध्ये जास्त पाहायला मिळतो असे दिल्लीच्या जीटीबी हॉस्पिटलमध्ये मेडिसिन विभागाचे डॉ.अजित कुमार सांगतात. ज्येष्ठांना देखील हा आजार होतो. एकदा का हा आजार झाला की तो आयुष्यभर बरा होत नाही, अस्थमाला मूळापासून बरे का करता येत नाही ? यावर बोलताना डॉ.अजित कुमार सांगतात की अस्थमा हा एक गंभीर आजार आहे. यात अनेक प्रकारच्या पेशी, प्रोटीन आणि हार्मोन्सचा समावेश असतो. अस्थमा एक आजार असला तर त्याचे अनेक प्रकार आहेत, एलर्जिक अस्थमा, नॉन-एलर्जिक अस्थमा सर्वासाठी वेगवेगळे उपचार प्रणाली आहेत. एलर्जीमुळे होणाऱ्या या आजारासाठी कोणतेही एक असे औषधही तयार झालेले नाही जे या आजाराला संपूर्ण बरे करु शकेल.
अस्थमावर कोणताही उपचार नसला तरी त्याला सहज नियंत्रणात ठेवता येऊ शकते असे डॉ. अजित सांगतात.यासाठी इन्हेलर्स कॉर्टिकोस्टेरॉईड्स आणि इम्युनोथेरपीसारखी औषधे आहेत. इन्हेलर्स श्वासनिलिकेतील सूज कमी करतात आणि अस्थमाची लक्षणे कमी करतात. इम्युनोथेरपीच्या मदतीने इम्युनिटीला चांगले करता येते. ज्यामुळे रुग्णाला या आजाराशी लढता येते. परंतू यांची देखील एक मर्यादा असते. जर अस्थमाचा आजार सुरुवातीलाच ओळखता आला तर चांगले असते. कारण जण लक्षणे बिघडली तर या आजाराला नियंत्रित करणे खूपच कठीण होऊ शकते.
अस्थमा आजाराला सुरुवातीलाच ओळखण्यासाठी तुम्हाला त्याच्या लक्षणांची माहिती असायला हवी. जर तुम्हाला जास्त खोकला येत असेल, सारखा-सारखा खोकला होत असेल, खोकताना श्वास घ्यायला त्रास होत असेल, खोकला आणि छातीत घरघर होत असेल किंवा छातीत अखडल्यासारखे वाटत असेल तर ही अस्थमाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. जर तुम्हाला यापैकी काही लक्षणे दिसत असतील तर लागलीच डॉक्टराची भेट घ्या असे पल्मोनोलॉजिस्ट डॉ.भगवान मंत्री सांगतात. डॉक्टर फुप्फुसाची तपासणी करुन अस्थमाला ओळखू शकतात. तसेच डॉक्टर रक्ताची चाचणी करुनही अस्थमाची तपासणी करु शकतात. जर चाचणीत अस्थमा सापडला तर योग्य वेळी या आजारावर उपचार करुन त्याला नियंत्रणात आणता येऊ शकते.