बिछान्यावर पडताच झोपी जाणे हे काही लोकांसाठी दिवा स्वप्न आहे. कारण, बहुतांश लोकांना काही केल्या लवकर झोपच येत नसल्याची समस्या आहे. चुकीच्या जिवनशैलीचा अवलंब होत असल्याने रात्री झोपताना झोप न येण्याच्या समस्येला (Problems with insomnia) अनेकांना सामोरे जावे लागत आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम (Bad results) होतो. सामान्यतः अति थकव्यामुळे झोप अगदी सहज येते. पण काही लोकांच्या बाबतीत असे होत नाही. काही लोक असेही आहेत जे झोपेसाठी औषधांच्या आहारी गेले आहेत. आम्ही तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहोत जिने तुम्हाला बेडवर पडताच 2 मिनिटांत झोप येऊ शकते. टीकटॉक वरील एका युजर ने झोपेच्या ट्रिकबाबत (About sleep tricks) व्हिडीओ व्ह्ययरल केला आहे. त्याने सांगीतल्याप्रमाणे तुम्हीही प्रयोग करून, दोन मिनीटात झोपण्याचा प्रय़त्न करून पहा.
Tiktok या सोशलमिडीया प्लॅटफॉर्मवर एका युजरचेyoungeryoudoc नावाचे खाते आहे. झोपेच्या ट्रिक बाबत त्याने अपलोड केलेला व्हिडीओ खुप व्हायरल होत असून दिवसाला पंचवीस हजारा पर्यंत त्याला लाईक मिळू लागले आहेत. या व्यक्तीने सांगितले की, मनगटावर विशिष्ट जागा चोळल्याने तुम्हाला चुटकी सरशी झोप येऊ शकते. काही मिनिटे असे केल्याने तुम्हाला गाढ झोप लागेल, असा दावा त्या व्यक्तीने केला आहे. व्हिडिओमध्ये झोप येण्यासाठी, या व्यक्तीने आपल्या मनगटाच्या आतील बाजूच्या पल्स पॉईंटला वर्तुळाकार हालचालीत 2 ते 3 मिनिटे मालिश करण्याबद्दल सांगितले आहे. टिकटॉकवरील ही 2 मिनिटांची झोपेची युक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मनगटाच्या आतील बाजूस नाडी बिंदू हा एक एक्यूप्रेशर पॉईंट आहे. जेव्हा तुम्ही या जागेवर हलक्या हातांनी घासता किंवा दाब देता, तेव्हा तुमचे मन शांत होते. पारंपारिक चिनी औषधांमध्ये, मनगटाच्या या भागाला शेन मेन म्हणतात, ज्याचा हिंदीत अर्थ ‘आत्म्याचा दरवाजा’ असा होतो.
2010 आणि 2015 मध्ये केलेल्या दोन वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये, लोकांच्या मनगटाच्या नाडीच्या बिंदूंमध्ये मालिश करण्यात आली, ज्याचे परिणाम खूप चांगले होते. या सर्व लोकांच्या झोपेची समस्या सुटली आणि झोपेची गुणवत्ताही प्रचंड सुधारली. झोपेच्या विकाराची समस्येवर प्रभावी उपाय सापडल्याचे अभ्यासात निष्पन्न झाले आहे.