मासिक पाळीच्या काळात प्रत्येक मुलीने स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या दरम्यान मुलींना, महिलांना प्रचंड त्रास होतो. त्रासही वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कुणाचे हातपाय गळून जातात. कुणाला वेदना असह्य होतात. अशात मासिक पाळी दरम्यान तुम्ही काय काळजी घ्यावी हे आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत. जाणून घेऊया मासिक पाळीदरम्यान काय करू नये?
पीरियड्सदरम्यान पॅडचा वापर केला जातो हे तुम्हाला माहित असलेच पाहिजे. पण पॅड कधी बदलायचा हे तुम्हाला माहित असायला हवं. याबद्दल अनेकजण संभ्रमात राहतात, पण जर तुम्हाला याची माहिती नसेल तर तुम्हाला गंभीर समस्या येऊ शकते. एकच पॅड 4 तासांपेक्षा जास्त काळ लावू नये, याचे कारण असे आहे की पॅड जास्त वेळ लावल्याने रक्त शोषले जात नाही. त्यामुळे दिवसातून ३ वेळा पॅड बदला.
मासिक पाळीत वेदना झाल्यामुळे थकवा येतो. अशा वेळी अनेक जण व्यायाम सोडून देतात. पण तसे अजिबात करू नये.
मासिक पाळीत सूज येण्याची समस्या उद्भवते. अशावेळी पीरियड्सदरम्यान जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात अनेक प्रकारचे आजार होतात. त्यामुळे आपल्या आहारात मिठाच्या पदार्थांचा समावेश करू नका.
मासिक पाळीदरम्यान आपल्या शरीरातून रक्त बाहेर पडते. त्यामुळे या वेळी शरीराला अधिक पोषणाची गरज असते. अशा वेळी नाश्ता अवश्य करावा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)