World Alzheimer’s Day 2023 : अल्झायमर हा मेंदूशी संबंधित रोग आहे. ज्यामध्ये मेंदू संकुचित होऊ लागतो आणि मेंदूच्या पेशी मृत होऊ लागतात. यामुळे स्मरणशक्ती कमी होते. दैनंदिन कामे करण्याची क्षमता कमी होते. अल्झायमर रोग एक गंभीर स्थिती आहे. यावर त्वरित उपचार आवश्यक आहे. दरवर्षी जागतिक अल्झायमर दिन हा या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लवकर उपचाराचे महत्त्व कळावे यांसाठी साजरा केला जातो. दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर दिवस साजरा केला जातो.
अल्झायमर डिसीज इंटरनॅशनल संस्थेची स्थापना 1984 मध्ये जगभरातील अल्झायमर रूग्णांना मदत करण्यासाठी झाली होती. योग्य उपचार प्रदान करण्यासाठी ही संस्था काम करते. 1994 मध्ये जागतिक अल्झायमर दिवस सुरू करण्यात आला. तेव्हापासून जगभरात 21 सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर दिवस साजरा केला जातो.
जागतिक अल्झायमर दिन यंदा गुरुवारी साजरा केला जाणार आहे. व्यक्तींसाठी जोखीम कमी करण्याच्या धोरणांचा यात समावेश आहे. रोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार पर्यायांबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.