World Diabetes Day 2021 | मधुमेह 5 अवयव निकामी करतो, पण चिंता नको, घरच्या घरी असा करा इलाज

| Updated on: Nov 14, 2021 | 10:47 AM

दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. याच पाश्वर्वभूमीवर मधुमेह आपल्या शरीरातील कोणत्या अवयवांवर थेट वार करतो हे जाणून घेऊयात.

World Diabetes Day 2021 | मधुमेह 5 अवयव निकामी करतो, पण चिंता नको, घरच्या घरी असा करा इलाज
Healthcare
Follow us on

मुंबई : साखर किंवा त्यापासून तयार केलेले पदार्थ कोणाला आवडत नाहीत पण आयुर्वेदात सफेद पदार्थ विषासमान मानले जातात. शरीरीत साखरेचे प्रमाण वाढल्यास मधुमेह सारख्या आजाराला सामोरे जावे लागते. मधुमेहाच्या आजाराने तरुण पिढीतील लोकांनाही आपले बळी बनवायला सुरुवात केली आहे. रक्तातील साखरेचा हा आजार अनियंत्रित झाला तर तो माणसाला मृत्यूच्या दारात घेऊन जाऊ शकतो. अनेक डॉक्टरांच्यामते आरोग्यादायी जीवनशैलीचा अवलंब केल्यास मधुमेहासारखे आजार टाळता येऊ शकतात. दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. याच पाश्वर्वभूमीवर मधुमेह आपल्या शरीरातील कोणत्या अवयवांवर थेट वार करतो हे जाणून घेऊयात.

अंधत्व – मधुमेह टाइप 2 असलेल्या रुग्णांना अंधुक दिसू लागते. मधुमेहामुळे तुमच्या डोळ्यातील लहान रक्तवाहिन्यांचे नुकसान करु शकते. यामुळे मोतीबिंदू आणि डायबेटिक रेटिनोपॅथीचा धोका वाढतो.

मज्जातंतूंचे नुकसान – जर तुम्हाला टाइप 2 मधुमेह असेल तर तुमच्या मज्जातंतूंच्या नुकसानाचा धोका संभावत असतो. त्याचा तुमच्या हातांवर आणि पायांवर परिणाम होऊ शकतो. हात पाय सुन्न होणे, मुंग्या येणे किंवा जळजळ होणे, वेदना, डोळ्यांच्या समस्या आणि अशक्तपणा ही त्याची लक्षणे निर्माण होतात.

हृदयाचे नुकसान – मधुमेहावर नियंत्रण न ठेवल्यास उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. जर तुम्हाला टाईप 2 मधुमेहाचा त्रास होत असेल तर सोडियमयुक्त आहार घ्या आणि तुमचे बीपी नियमितपणे तपासा.

पायाचे व्रण – शिरा आणि रक्ताभिसरण खराब झाल्यामुळे पायात अल्सरसारख्या समस्या उद्भवू शकतात. या पायाचे व्रण कधी कधी संक्रमित देखील होऊ शकतात. पायाचे व्रण टाळण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी पाय स्वच्छ व कोरडे ठेवावेत. आरामदायक आणि हलके मोजे घाला. पायावर कोणत्याही प्रकारची जखम असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा

मूत्रपिंड निकामी – रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो. त्याचा मूत्रपिंडाच्या फिल्टरिंग क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी घरगुती उपाय

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. प्रत्येकाच्या घरामध्ये दालचिनी असतेच त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये दालचिनीचा वापर करु शकता. दालचिनीमध्ये बायोएक्टिव्ह कंपाऊंड असते. हे मधुमेह विरूद्ध आणि प्रतिबंध करण्यास मदत करते. दालचिनीमुळे शरीरातील इन्सुलिन वाढवण्यास मदत होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. मधुमेह असलेल्या व्यक्तीने आपल्या आहारात दालचिनीचा समावेश केला पाहिजे. मात्र, दालचिनीचे अधिक सेवन हानिकारक आहे.

कोरफड आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. कोरफड खाण्यासाठी कडू लागत असली तरी देखील शरीरातील साखरेची पातळी संतुलित राखण्यासाठी कोरफड मदत करते. फक्त कोरफड खाणे शक्य नसल्यास आपण ताकामध्ये कोरफडचा गर घालून पिऊ शकतो. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे. त्यांनी आपल्या आहारात दररोज कोरफड घेतली पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक