या किरकोळ वेदनांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, पडेल महागात!

| Updated on: Apr 06, 2023 | 1:56 PM

आपल्या शरीराला अनेक किरकोळ वेदनांना सामोरे जावे लागते. याच किरकोळ वेदनांकडे आपण सहज दुर्लक्ष करतो, परंतु असे करणे धोकादायक ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नये.

या किरकोळ वेदनांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, पडेल महागात!
Dont ignore this
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: जागतिक आरोग्य दिन दरवर्षी 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो, जो डब्ल्यूएचओ आणि अनेक संस्था साजरा करतात. आरोग्याविषयी जनजागृती करणे हा त्याचा उद्देश आहे. ही मोहीम अधिकृतपणे 1950 साली सुरू झाली, त्यानंतर दरवर्षी ती साजरी केली जाते. या खास प्रसंगी आपण आपल्या आरोग्याबाबतही सावध गिरी बाळगली पाहिजे. आपल्या शरीराला अनेक किरकोळ वेदनांना सामोरे जावे लागते. याच किरकोळ वेदनांकडे आपण सहज दुर्लक्ष करतो, परंतु असे करणे धोकादायक ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नये.

या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका

सततची डोके दुखी

झोप न लागणे आणि ताण तणाव यासह अनेक कारणांमुळे डोकेदुखी होऊ शकते, परंतु जर आपल्याला वारंवार या वेदनांमधून जावे लागले तर ते मायग्रेनचे लक्षण असू शकते, म्हणून त्वरित तपासणी करा आणि त्यावर उपाय करा.

स्नायू दुखणे

व्हिटॅमिन डीची कमतरता हे स्नायू दुखण्याचे मुख्य कारण आहे कारण बऱ्याच शहरी घरांमध्ये सूर्यप्रकाश मिळत नाही. यामुळे स्नायू दुखणे अटळ असले तरी याची अनेक कारणे असू शकतात. या जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी काही खाद्यपदार्थही खाल्ले जाऊ शकतात. या वेदनेकडेही दुर्लक्ष करू नये.

छातीत दुखणे

छातीत किंचित वेदना झाल्यास डॉक्टरांनाच भेटावे, सामान्यत: हे हृदयरोगाचे लक्षण असते. विशेषत: शरीराच्या डाव्या बाजूला दुखणे ही यासाठी खूप महत्वाची चेतावणी मानली जाते. काळजी न घेतल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

सांधेदुखी

दुखापत, सूज आणि सर्दीसह अनेक कारणांमुळे सांधेदुखी उद्भवू शकते. सांधेदुखीची समस्या आजकाल खूपच सामान्य झालीये. पूर्वी ही समस्या फक्त मध्यम आणि वृद्ध लोकांमध्येच दिसून येत होती, परंतु आता अनेक तरुण याला बळी पडत आहेत. कदाचित शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल, पण याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं.

ओटीपोटात दुखणे

ही सहसा पाचन तंत्राशी संबंधित समस्या मानली जाते, परंतु ती मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर समस्या असू शकते. पण योग्य तपासणी नंतरच खरा आजार ओळखता येईल. या वेदनेकडेही सहज दुर्लक्ष करू नये.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)