मुंबई : दररोज सकाळी योगा करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे केवळ शारीरिक दुर्बलताच कमी होत नाही, तर मानसिक शांतताही मिळते. कोरोना कालावधीत, सतत योगा करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. संसर्गाच्या दुसर्या लाटेपासून आराम मिळाला असला, तरी तिसर्या लाटेचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे (Yoga for children to boost their immunity during corona pandemic).
संसर्गाच्या या तिसर्या लाटेत, आपल्या मुलांनी निरोगी रहावे, यासाठी त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी मुलांच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये योगाचा नक्कीच समावेश करा. यामुळे ते केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही निरोगी राहतील. योगा केल्याने मुले निरोगी राहण्याबरोबरच चपळ देखील राहतील. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही योगासनांविषयी सांगत आहोत, जे लहान मुलांसाठी फायद्याचे ठरतील.
प्रणाम आसन : हे आसन मुलांसाठी खूप सोपे आहे. हे आसन केल्याने मज्जासंस्था शांत होते. म्हणून निश्चितपणे आपल्या मुलांच्या नित्यकर्मात याचा समावेश करा.
पर्वतासन : हे आसन मुलांसाठीही चांगले मानली जाते. यामुळे खांद्यांना बळकटी येते. तसेच, पाठ, खांदा आणि मान दुखणे देखील बरे होते.
वृक्षासन : वृक्षासन हे मुलांसाठी वरदान असल्यासारखे आहे. हा योगा केल्याने मुलांची उंची वाढते. अशा परिस्थितीत, वाढत्या अवस्थेतील मुलांना नक्कीच वृक्षासन करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पाय आणि हात यांचे स्नायू ताणले जातात, जे उंची वाढवण्यात खूप फायदेशीर ठरतात.
(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
(Yoga for children to boost their immunity during corona pandemic)
Health | मधुमेहग्रस्त रुग्णांनी ‘या’ 3 प्रकारे करा दुधाचे सेवन, नियंत्रणात राहतील अनेक आजार!