Breast Cancer: लाज, संकोच बाळगू नका, ब्रेस्ट कॅन्सर या भयंकर आजारावर अशी करा मात

| Updated on: Jul 04, 2024 | 5:57 PM

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया पोस्टमध्ये एक चिंताजनक बातमी दिली होती. तिने सांगितले की ती ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजमध्ये आहे. या आजाराचे निदान झाल्यानंतर काही दिवसांतच तिच्यावर उपचार सुरू झाले आहेत. स्तनाचा कर्करोग हा एक गंभीर कर्करोग आहे जो दरवर्षी लाखो महिलांना प्रभावित करतो. काय आहे हा आजार जाणून घ्या.

Breast Cancer: लाज, संकोच बाळगू नका, ब्रेस्ट कॅन्सर या भयंकर आजारावर अशी करा मात
Follow us on

काही दिवसांपूर्वीच हिना खान हिने सोशल मीडियावर ती ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्याशी झुंज देत असल्याची माहिती शेअर केली होती. स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण सध्या वाढत आहे. संशोधक, तज्ञ आणि स्तनाचा कर्करोगावर मात केलेल्या सेलिब्रिटींचा असा विश्वास आहे की या धोकादायक आजारावरही मात केली जाऊ शकते. या आजाराशी पीडित व्यक्तीने जर तिच्या आजारावर लाज, संकोच आणि भीतीच्या पलीकडे जाऊन नियमित उपचार घेतले तर कोणीही या आजारावर नक्कीच मात करु शकतात. स्त्रिया याला सामाजिक कलंक मानतात आणि उपचार घेण्यात विलंब करतात. पण असे करु नये. सुप्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत ती या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात असल्याचं सांगितलं. तेव्हा इंडस्ट्री आणि तिच्या चाहत्यांमध्ये भीती आणि चिंतेची लाट पसरली. यामुळे चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला चिंता वाटणे स्वाभाविक आहे. कारण देशात कर्करोगाने होणाऱ्या महिलांच्या मृत्यूची आकडेवारी भीतीदायक आहे.

ताहिराने केली ब्रेस्ट कॅन्सरवर मात

कॅन्सरवर मात केलेल्या ताहिरा कश्यपनेही खुलासा केलाय की, ‘माझ्या उपचारादरम्यान मला असे कळले की अनेक महिलांची मॅमोग्राफी आणि केमोथेरपी केवळ संयुक्त कुटुंब पद्धतीत ब्रा बद्दल बोलू शकत नसल्यामुळे होत नाही. त्यामुळे यावर उपचार न मिळाल्याने अनेकांना जीवही गमवावा लागतो.

दरवर्षी येतात दीड ते दोन लाख नवीन केसेस

डब्ल्यूएचओ आणि कर्करोगावर संशोधन करणाऱ्या संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी 1.5 ते 2 लाख नवीन कर्करोगाच्या केसेस आढळत आहेत, ज्यामध्ये सुमारे 25 टक्के महिलांचा मृत्यू होतो. ही नक्कीच चिंतेची बाब आहे. देशातील वाढत्या स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या पाहता भारताला कर्करोगाची राजधानी म्हणून घोषित केले आहे.

अनेक अभिनेत्रींनी कर्करोगावर केली मात

केवळ ताहिरा कश्यपच नाही तर मुमताज, सोनाली बेंद्रे, महिमा चौधरी, छवी मित्तल यांनी देखील कॅन्सरवर मात केली आहे. त्यांनी या आजाराला कोणत्याही प्रकारचा सामाजिक कलंक न मानता त्याची लाज न बाळगता त्यावर योग्य ते उपचार घेतले आणि बरे झाले. त्यांनी यावर जनजागृती देखील केली. ताहिरा कश्यपने तिच्या प्रवासावर एक पुस्तक लिहिले आहे. छवी मित्तलने देखील संपूर्ण स्तन शस्त्रक्रिया समजावून सांगितली.

हिना खानने अभिनेत्रीला केला फोन

कॅन्सरशी लढा देणारी महिमा चौधरी हिने सांगितले की, ‘जेव्हा हिना खानला तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याची माहिती कळाली. तेव्हा तिने सर्वप्रथम मला फोन केला. ती म्हणाल की, जर महिलांनी त्यांच्या आजाराविषयी उघडपणे बोलले तरच जनजागृती होईल. कारण हा एक प्रवास आहे. त्यावर उपचार कसा घ्यावा याबाबत मनात 100 प्रकारचे प्रश्न आहेत. तुमच्यावर होणार उपचार योग्य आहेत का असा प्रश्न देखील कोणालाही पडू शकतो. मी जगेन की नाही? या भीतीने अनेक जण जगत असतात. स्त्रिया या त्यांच्या शारीरिक स्वरूपाबद्दल (त्यांचे स्तन) खूप चिंतित असतात. आजकाल तर ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्टिव्ह (स्तन रिकन्स्ट्रक्शन सर्जरीमध्ये इम्प्लांट करून नवे ब्रेस्ट तयार केले जातात) आणि प्लॅस्टिक सर्जरी एवढ्या प्रगत झाल्या आहेत की, कोणालाच काही कळत नाही. कर्करोगामध्ये आवश्यक असल्यास स्तनाची शस्त्रक्रिया करणे खूप आवश्यक आहे.

81 वर्षीय महिलेने ब्रेस्ट कॅन्सरची लढाई जिंकली

डॉ. तस्नीम भारमल, असोसिएट कन्सल्टंट, मेडिकल ऑन्कोलॉजी या सांगतात की, ‘आमच्याकडे येणाऱ्या ८० टक्के केसेस अशा आहेत ज्या लाजाळूपणामुळे किंवा संकोचामुळे वेळेवर येत नाहीत. अनेक स्त्रिया डॉक्टरांना त्यांचे स्तन दाखवू इच्छित नाहीत. अनेकांना असे वाटते की यात स्तन कापावे लागतील. यामुळे त्यांचे स्त्रीत्व कमी होईल. कॅन्सरबाबत खूप भीती आहे आणि जागरूकतेचा अभाव आहे. पण आजच्या काळात, लवकर निदान झाल्यानंतर, तुम्ही लम्पेक्टॉमी करू शकता.

संपूर्ण स्तन काढण्याची गरज नाही

ती म्हणते, ‘कर्करोगाच्या प्रसारामुळे, स्तनाची पुनर्रचना किंवा पुनर्रोपण जेथे केले जाते तेथे मास्टेक्टॉमी करावी लागते. जितक्या लवकर तुम्हाला कॅन्सर आढळेल तितक्या कमी रुग्णाला तिचे संपूर्ण स्तन काढून टाकावे लागेल. जरी ते प्रगत अवस्थेत आढळले असले तरी, स्तन काढून टाकावे लागेल असे नाही. ब्रेस्ट सॅल्व्हेज करता येते. एका प्रकरणात, पहिल्या टप्प्यातच एक 81 वर्षीय महिला आमच्याकडे आली. शस्त्रक्रियेद्वारे त्यांची गाठ काढण्यात आली असून आज ते निरोगी आहेत. 40 वर्षांची झाल्यानंतर वर्षातून एकदा मॅमोग्राफी चाचणी करावी.

आशेचा सूर्य मावळू देऊ नका

कर्करोगाशी लढण्यासाठी काही जर सर्वात महत्त्वाचे असेल तर ते आहे प्रबळ इच्छाशक्ती. यासोबतच महिलांना त्यांच्या कुटुंबाचा भक्कम पाठिंबाही महत्त्वाचा असतो. या दोन गोष्टी जर असतील तर कोणीही या आजारावर नक्कीच मात करु शकतात. छवी मित्तल असो की सोनाली बेंद्रे यांना त्यांच्या कुटुंबाने भक्कम आधार दिला. पण त्यासोबतच त्यांची प्रबळ इच्छाशक्ती देखील या लढ्यात त्यांना विजयी करुन गेली. छवी मित्तल म्हणाली की, ‘माझा पती मोहित हुसैन हा माझा सर्वात मोठा आधार होता. पण काही लढाया तुम्हाला एकट्याने लढाव्या लागतात. महिमा चौधरी म्हणते की, ‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे कुटुंब, जवळचे मित्र यांचा पाठिंबा. विशेषतः जर तुमची मुले लहान असतील. माझ्यासाठी सर्वात कठीण टप्पा भावनिक, शारीरिक आणि मानसिक होता. माझी केमोथेरपी जितकी जास्त होत गेली, तितकी मी अशक्त होत गेलो. उपचारादरम्यान शारीरिक स्वरूप देखील बदलते. केस गळतात, चेहरा कमजोर होतो. तुम्ही भावनिकदृष्ट्या तुटायला सुरुवात करता. मी रात्रंदिवस खूप रडायचे हे कसं विसरू? तुमच्याकडे कितीही लोक आले तरी तुम्हाला तुमच्याकडून ताकद घ्यावी लागेल. जेव्हा तुम्ही एकटे पडता तेव्हा तुम्हाला स्वतःला सांगत राहावे लागेल की सर्व काही ठीक होईल. ती आशा सूर्यासारखी आहे, ती मावळते आणि उगवते. तुम्ही फक्त तो सूर्य मावळू देऊ नये.

डॉ प्रीतम कटारिया, सल्लागार, वैद्यकीय ऑन्कोलॉजी, सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल या सांगतात की, ‘भारतासह जगभरातील स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हा कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. जागतिक स्तरावर त्याचे प्रमाण वाढत आहे. रोग बरा करण्यासाठी लवकर त्याची ओळख आणि उपचार खूप महत्वाचे आहेत. स्तनाच्या कर्करोगाचा धोका बदलण्यायोग्य आणि न बदलता येण्याजोगा अशा विविध घटकांमुळे प्रभावित होतो. न बदलता येण्याजोग्या घटकांमध्ये वाढलेले वय आणि अनुवांशिक पूर्वस्थिती जसे की BRCA उत्परिवर्तन यांचा समावेश होतो. सुधारण्यायोग्य घटकांमध्ये लठ्ठपणा, उशीरा बाळंतपण, धूम्रपान आणि मद्यपान यांचा समावेश होतो.’

‘निरोगी आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान आणि अल्कोहोल टाळणे आणि प्रदूषणाच्या संपर्कात कमी येणे यासारखे बदल जीवनशैलीत केले तर स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. अंतर्गत आरोग्य घटक जसे की बॉडी मास इंडेक्स, आहार गुणवत्ता, तणाव पातळी आणि प्रदूषणासारखे पर्यावरणीय घटक देखील स्तनाच्या कर्करोगाच्या जोखमीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जागतिक स्तरावर स्तनाच्या कर्करोगाच्या घटना कमी करण्यासाठी या घटकांची जागरूकता आणि सक्रिय व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.’

स्तनाचा कर्करोग म्हणजे काय?

आपल्या शरीरात अनेक पेशी असतात. जेव्हा या पेशी कोणत्याही अवयवामध्ये असाधारणपणे वाढू लागतात तेव्हा कर्करोगाची शक्यता वाढते. स्तनाच्या कर्करोगात, पेशी एक ट्यूमर बनवतात, जी ढेकूळ सारखी वाटतात.

स्तनाच्या कर्करोगाचे वेगवेगळे टप्पे कोणते आहेत?

स्टेज-1 सौम्य: यामध्ये कर्करोग फक्त स्तनापुरता मर्यादित असतो.

स्टेज-2 मध्यम: कर्करोग स्तनापासून सुरू होतो आणि काखेपर्यंत पसरतो.

स्टेज-3 आणि 4: जर कर्करोग यकृत, फुफ्फुस किंवा हाडांपर्यंत पोहोचला असेल तर तो स्टेज 4 असतो.

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे काय आहेत?

निप्पलमधून रक्तरंजित स्त्राव होतो. वजन स्थिर राहते, परंतु स्तनाचा आकार वाढतो. स्तनामधील गुठळ्यामध्ये वेदना होत नसेल तर ते धोकादायक आहे. वेदना होत असतील तर कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. जरी एखादी स्त्री गर्भवती नसली किंवा ती स्तनपान करत नसली तरीही स्तनातून दूध किंवा पाण्यासारखा स्त्राव होऊ शकतो. स्तनाच्या आकारात बदल होतो.

स्तनाच्या कर्करोगाची कारणे

लोकांना असे वाटते की स्तनाचा कर्करोग हा अनुवांशिक आहे, याचा अर्थ कुटुंबात तो कोणाला असेल तर तुम्हाला ही होईल असं नसतं. स्तनाच्या कर्करोगाच्या केवळ 10-15 टक्के प्रकरणे अनुवांशिक असतात. त्याची नेमकी कारणे अद्याप कळू शकलेली नाहीत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा कॅन्सर केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही प्रभावित करू शकतो.